Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
इथिओपिया देशामध्ये शनिवारी भीषण दहशतवादी हल्ला झाला. एका बसवर झालेल्या या हल्ल्यामध्ये सुमारे ३४ लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. याबद्दल देशाच्या मानवाधिकार आयोगाने याबाबत माहिती दिली. शिन्हुआ वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, इथिओपियाच्या पश्चिमी भागातील बेनिशंगुल-गुमेज या राज्यामध्ये शनिवारी हा हल्ला झाला. हा हल्ला कशामुळे करण्यात आला, किंवा कोणत्या दहशतवादी संघटनेने हा हल्ला केला याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. देशातील विविध गटांमधील वाढत्या हिंसाचारामुळे इथिओपिया त्रस्त झाला आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये देशात अशा प्रकारच्या हिंसाचारामुळे शेकडो लोकांचा मृत्यू झाला असून, हजारो लोकांना स्थलांतर करावे लागले आहे. या गटांमधील हिंसाचार हा प्रामुख्याने जमिनीसाठी आणि सत्ता गाजवण्यासाठी होत आहे.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143