fbpx
thane 750x375 1
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

ठाणे –  शहापूर तालुक्यातील ९७ आदिवासी गावे आणि २५९ पाड्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी २७६ कोटी रुपयांच्या भावली धरणाच्या पाणीपुरवठा योजनेस मंजुरी देण्यात आली असून त्यासाठी येत्या १५ दिवसात निविदा प्रक्रिया राबविण्यात येईल. तसेच पुढील अडीच ते तीन वर्षात ही योजना पूर्ण करून या भागातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यात येईल. ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांना गती देऊन प्राधान्याने त्या योजना मार्गी लावण्याचे  निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री श्री पाटील म्हणाले, जल जीवन मिशन अंतर्गत येणारी ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांची प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावीत. जिल्ह्यातील प्रलंबित पाणीपुरवठा योजनांचा दरमहा  विभागाच्या अधिकाऱ्यांनी आढावा घ्यावा. जलजीवन मिशनद्वारे प्रत्येक व्यक्तीला स्वच्छ व शुद्ध पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी नियोजन करावे तसेच अपूर्ण असलेल्या योजनांचे पुनरुज्जीवन करावे. २१ मार्चपर्यंत सर्व योजना पूर्ण करण्यासाठी संबंधित विभागांनी नियोजन करावे.सर्व तालुक्यांच्या पाणीपुरवठा योजनांना सहकार्य करण्याची तसेच त्या वेळेत पूर्ण करण्याची ग्वाही पाटील यांनी दिली.

योजना अपूर्ण राहिल्यास अधिकाऱ्यांवर कारवाई होणार

जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना अपूर्ण राहिल्यास त्यासाठी सर्वस्वी अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्यात येईल व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात येईल असा इशाराही श्री. पाटील यांनी दिला.  पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांचे पुनरुज्जीवन करण्याबरोबरच त्या तात्काळ मार्गी लावण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध करुन देण्याची  मागणी केली. जलजीवन मिशन अंतर्गत अंबरनाथ, भिवंडी, कल्याण, मुरबाड, शहापूर तालुक्यातील प्रगतीपथावरील पाणीपुरवठा योजनांचा आढावा घेण्यात आला. संबंधित तालुक्यातील आमदारांनी पाणीपुरवठा योजनांसाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.भाऊसाहेब दांगडे यांनी केले. जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजनांच्या कार्य अहवालाचे सादरीकरण कार्यकारी अभियंता (ग्रामीण पाणीपुरवठा) एच.एल.भस्मे यांनी केले. आभार प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांनी मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update