fbpx
Rape

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.

औरंगाबाद Rape – शहरातील गारखेडा परिसरातील एका प्रसिद्ध हॉस्पिटल मध्ये काम करत असताना डॉक्टरने परिचारिकेवर अत्याचार केला. तिला दिवस गेल्यानंतर डॉक्टरने गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात केला. त्या डॉक्टरच्या तीन मित्रांनी तिचा विनयभंग केला. या धक्कादायक प्रकरणी दामिनी पथकाने केलेल्या मदतीनं तर मुकुंदवाडी पोलिस Police ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आल्याचे निरीक्षक ब्रम्हागिरी यांनी सांगितले.

Temple: प्रभाग 8 येथे विविध कामाचे सुशोभीकरण, सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मल्लिकार्जुन मंदिरास विद्युत रोषणाई

             पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामिनी पथक पेट्रोलिंग करत असताना सोमवारी सिडको बसस्थानकावरील सुरक्षा रक्षकाने फोन करून एका २५ वर्षीय तरुणीला मदतीची गरज असल्याचे सांगितले. लगेच उपनिरीक्षक सुवर्णा उमाप, लता जाधव, निर्मला निंभोरे, मनीषा बनसोडे आणि गिरिजा आंधळे घटनास्थळी पोहोचल्या. तेव्हा ती तरुणी घाबरलेल्या अवस्थेत दिसली. तिला विश्वासात घेऊन चौकशी केली असता गारखेड्यातील रुग्णालयात ती नर्स म्हणून तीन महिन्यांपासून कार्यरत असल्याचे म्हणाली. याच रुग्णालयातील डॉ. प्रसादने तिच्यासोबत पडेगावातील फ्लॅटवर तसेच वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध प्रस्थापित Rape केले. त्यातून ती गरोदर राहिली. तिला गर्भपाताच्या गोळ्या देऊन गर्भपात करण्याचा प्रयत्न केला.

         तरुणी गरोदर Pregnant राहिली असता गर्भपाताच्या गोळ्या देऊन तिचा गर्भपात करण्याचा प्रयत्न केला. मुलीला रक्तस्त्राव होऊन तीव्र वेदना होत असल्यामुळे ती डॉक्टरकडे गेली असता, त्याने परत तिला मुकुंदवाडी पोलीस हद्दीत जालना रोडवर असलेल्या नातेवाईकाच्या हॉटेलमध्ये नेऊन त्या परिस्थितीतही तिच्याशी शारीरिक संबंध Rape जबरदस्तीने ठेवले आणि निघून गेला. त्यानंतर त्याच्या मावस भावाने देखील तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला, परंतु ती त्याच्या तावडीतून कशी बशी सुटून आली. डॉक्टरच्या इतर दोन मित्रांनी देखील तिचा विनयभंग केल्याचे तिने सांगितले. यानंतर पीडितेला मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेऊन तिच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. तपास मुकुंदवाडी ठाण्याचे पोलिस निरीक्षक ब्रह्मा गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अनिता बागुल करत आहेत.

 

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.

Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update