Solapur City News 116
Maharashtra

या राज्यांनी वाढवलं मोदी सरकारचं टेन्शन; कोरोना वाढल्याने आरोप प्रत्यारोप

नवी दिल्ली- देशात महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती खूपच गंभीर असल्याचं चित्र होतं. देशातील सर्वाधिक रुग्णसंख्या महाराष्ट्रात होती. एकट्या महाराष्ट्रानेच मोदी सरकारची चिंता वाढवली होती. पण आता मात्र कोरोनाविरोधी लढाईत महाराष्ट्रच आघाडीवर आहे. राज्यातील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे आणि लसीकरणाचा वेग वाढला आहे. आता महाराष्ट्र नव्हे तर इतर राज्यांनी मोदी सरकारचं टेन्शन वाढवलं आहे. महाराष्ट्रातील पॉझिटिव्हीटी रेट कमी झाला आहे. एकूण कोरोना चाचण्यांपैकी किती पॉझिटिव्ह रुग्ण आढळले हे सांगणारा आकडा म्हणजे पॉझिटिव्हीटी रेट. देशात कोरोनाचा सर्वाधिक पॉझिटिव्ही रेट हा राजस्थानमध्ये आहे. तर सर्वात कमी पॉझिटिव्हीटी रेट हा महाराष्ट्रात आहे.

कोरोना पॉझिटिव्ही रेट

राजस्थान – 37.11%

दिल्ली – 35.02%

गोवा – 4.27%

पश्चिम बंगाल – 32.93%

हरयाणा – 32.38%

छत्तीसगड – 27.80%

महाराष्ट्र – 21.89%

                आकडेवारी पाहिली तर महाराष्ट्रातील परिस्थिती तशी खूपच दिलासादायक आहे. महाराष्ट्रातील रुग्ण संख्या घटल्यामुळे देशातील नव्या रुग्णसंख्येतही घट आली आहे. राज्यात सोमवारी कोरोना रुग्णसंख्येत मोठी घट झाल्याचं पाहायला मिळालं. राज्यात दररोज 60 हजारांहून अधिक नवे रुग्ण आढळत असतात. मात्र, सोमवारी 48 हजार 700 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, रविवारी मृतांचा आकडा 800 हून अधिक असतानाच सोमवारी मृतांच्या संख्येतही घट झाली आहे. राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 43 लाखाहून अधिक झाली आहे. तर, कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्याही 65,000 च्या पुढे गेली आहे. यामुळे सोमवारी देशातील नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत किरकोळ घट नोंदवली गेली आहे. वर्ल्डोमीटरनुसार, देशात सोमवारी 3 लाख 20 हजार 435 कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर, 2764 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यानंतर भारतातील कोरोना रुग्णांची मृत्यूचा एकूण आकडा 1 लाख 97 हजार 880 वर पोहोचला आहे. तर, देशात सध्या कोरोनाचे 28 लाख 82 हजार 513 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

लसीकरणातही महाराष्ट्र अग्रेसर

लसीकरणाबाबतही महाराष्ट्रातून सकारात्मक बातमी आहे. राज्यात सोमवारी दिवसभरात रेकॉर्ड 5 लाख लशीचे डोस दिले गेले आहेत. महाराष्ट्र लवकरच एकूण 1.5 कोटी लसी देणारं पहिलं राज्य ठरू शकतं.

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com