fbpx
timely-road-facilities
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

औरंगाबाद Employment-  औरंगाबाद शहरातील विविध रस्त्यांची कामे वेळेत व गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करुन शहरवासियांना पायाभूत सेवासुविधा उपलब्ध करुन दिल्या जात असल्याचे प्रतिपादन नगर विकास व सार्वजनिक बांधकाम (Public construction) (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे यांनी शहरातील विविध रस्त्याच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी केले.

voter ‘ट्रू-व्होटर’ मोबाईल ॲपद्वारेदेखील मतदार यादीत नाव नोंदणीची सुविधा उपलब्ध

          यावेळी रोजगार (Employment) हमी व फलोत्पादन मंत्री संदिपान भूमरे, नोंदडचे खासदार हेमंत पाटील माजी खासदार चद्रकांत खैरे,आमदार अंबादास दानवे, संजय सिरसाट, रमेश बोरणारे, उदयसिंह राजपूत, यांची उपस्थिती होती. औरंगाबाद शहरातील बाळकृष्ण नगर ते शिवनेरी कॉलनी, विजयनगर चौक ते गजानन नगर, सिंधी कॉलनी तसेच संत एकनाथ रंगमंदीर ते शहा कॉलनी या तीन ठिकाणाच्या रस्त्याच्या सिमेंट क्रॉन्क्रेटी करण कामाच्या भूमीपूजन त्यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये विजयनगर चौक ते गजानन नगर रस्ता यासाठी एक कोटी, सिंधी कॉलनीस दोन कोटी व शहा कॉलनीच्या रस्त्यासाठी एक कोटी 20 लाख रूपयाचा निधी रस्त्यासाठी मंजूर करण्यात येत असल्याचे यावेळी शिंदे यांनी सांगितले.

3 Employment : गुणवत्तापूर्ण आणि नियोजित वेळेत रस्त्यांची सुविधा उपलब्ध करुन देणार – नगर विकासमंत्री

        शहरात चांगल्या प्रकारचे रस्ते, दळणवळण सुविधा ( Transportation facilities ) उपलब्ध असतील तर शहराचा विकास तुलनेने वेगाने होतो. रस्ते निर्मीतीसाठी रस्ते विकास महामंडळ, नगर विकास विभाग व इतर विभागाचा निधी उपयोगात आणला जात आहे. यातून विकास साध्य होत आहे. लोकप्रतिनिधींनी विकास कामाच्या पाठपुराव्या बरोबरच निधीचा योग्य वापर करुन जनतेलासुविधा उपलब्ध करुन देण्याचे काम करावे. औरंगाबाद शहरातील रस्त्यासाठी 152 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली असून याच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्ह्यातील विविध रस्ते कामांना गती येणार असल्याचे मंत्री शिंदे यांनी सांगितले. रस्ते विकासाबरोबरच समृद्धी महामार्ग, वाळूज, शेंद्रा- बिडकीन व डीएमआयसीच्या औद्योगिक वसाहतीच्या माध्यमातून औरंगाबाद जिल्हयाची औद्योगिक प्रगतीकडे वाटचाल सुरु आहे. विकासाबरोबरच तो  पर्यावरण पूरक व्हावा यासाठी सफारी पार्क, बाळासाहेब ठाकरे स्मृतिवन निर्मिती करण्याचा प्रयत्न केला असल्याचे मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update