Economy

‘दिलखुलास’ कार्यक्रमात उद्या व परवा उद्योग विकास आयुक्त

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ कार्यक्रमात ‘नवउद्योजकांना प्रोत्साहन’ या विषयावर उद्योग विभागाचे विकास आयुक्त डॉ.हर्षदीप कांबळे यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. ही मुलाखत राज्यातील आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवरून तसेच न्यूज ऑन एअर या ॲपवरून शुक्रवार, दि. 12 व शनिवार, दि. 13 मार्च 2021 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत प्रसारित होईल. निवेदिका शिबानी जोशी यांनी ही मुलाखत घेतली आहे. उद्योग संचालनालयाकडून नवउद्योजकांना देण्यात येणाऱ्या आवश्यक सोयी सुविधा, कार्नेल युनिव्हर्सिटी न्युयॉर्क यांच्यासोबतचा सामंजस्य करार, आतंरराष्ट्रीय विद्यापीठासोबत करार करून इनक्युबेशन केंद्र स्थापन करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य, याशिवाय विविध उपक्रमाची करण्यात येणारी अंमलबजावणी विविध योजनेसाठीची आर्थिक तरतूद आदी माहिती डॉ.हर्षदीप कांबळे यांनी ‘दिलखुलास’ या कार्यक्रमातून दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143