Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
औरंगाबाद- शासनाकडून जानेवारी महिन्यात काेरोना लस मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे लस देण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षित करण्याचे काम मनपाने सुरू केले आहे. शनिवारी मनपा आणि खासगी अशा शंभर डाॅक्टरांना लसीकरणाचे प्रशिक्षण देण्यात आले. यात आयएमए, निमा या संघटनांच्या डॉक्टरांनी सहभाग नाेंदवला. एमजीएम महाविद्यालयात जागतिक आरोग्य संघटनेचे अधिकारी डॉ. सय्यद मुजीब व मनपाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर यांनी प्रशिक्षण दिले. या वेळी होमिओपॅथी डॉक्टर, बालरोग संघटनेचे सदस्य असलेले डॉक्टर्स, फार्मासिस्ट यांना सहभागी करून घेण्यात आले होते. आरोग्य केंद्र, दवाखाने, शाळा, मंगल कार्यालये आदी ठिकाणी लसीकरणाची व्यवस्था केली जाणार आहे.
एका व्यक्तीला लसीच्या दोन मात्रा २८ दिवसांच्या अंतराने दिल्या जातील. यासाठी नागरिकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागेल. नोंदणी केलेल्यांना त्यांच्या मोबाइल क्रमांकावर मेसेज येणार आहे. त्यात लसीकरणाची तारीख, वेळ, ठिकाण याचा उल्लेख असेल. लसीकरणासाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख पटावी म्हणून त्याचे ओळखपत्र तपासले जाणार आहे. ही प्रक्रिया कशी असेल याची माहितीदेखील या वेळी देण्यात आल्याची माहिती मनपाचे जनसंपर्क अधिकारी तौसिफ अहमद यांनी दिली.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143
लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

