fbpx
download 13 राज्यातील सहकारी मजूर संस्थांनी स्थानिकांना रोजगार देऊन कामात पारदर्शकता आणा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- राज्यातील स्थानिक मजुरांना रोजगार मिळावा आणि त्यांना देण्यात येणाऱ्या मजुरीमध्ये पारदर्शकता यावी, यासाठी सहकारी मजूर संस्थांनी प्रयत्न करावेत. तसेच मजूर संस्थांना देण्यात येणाऱ्या कामांमध्ये पारदर्शकता आणावी, असे निर्देश सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी दिले. राज्यातील मजूर संस्थांच्या कामकाजासंदर्भात डॉ.कदम यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी राज्यमंत्री डॉ. कदम बोलत होते. डॉ.कदम म्हणाले की, राज्यात नोंदणीकृत सहकारी मजूर संस्थांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असून या संस्थेच्या माध्यमातून विशेषतः ग्रामीण महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकतो. मजूर संस्थांनी आपल्या उपलब्ध कामांवर स्थानिक मजुरांना रोजगार उपलब्ध करून देण्याबरोबरच त्यांना योग्य वेतन मिळेल याची काळजी घ्यावी. सहकार विभागाने सहकारी मजूर संस्थांना कामे मिळण्यासाठी निश्चित कार्यप्रणाली तयार करून सर्व संस्थाचा तपशील संकेतस्थळावर उपलब्ध करून द्यावा, असेही डॉ.कदम यांनी सांगितले. मजूर संस्थांच्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी मजूर संस्थांना देण्यात येणाऱ्या तीन लाखांपर्यंतच्या कामाची मर्यादा वाढविण्याची मागणी केली. याबाबत सकारात्मक दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येतील, असे डॉ.कदम यांनी सांगितले.

              बैठकीला सहकार विभागाचे अपर निबंधक ना.पा.यगलेवाड, पुणे जिल्हा उपनिबंधक एन. व्ही. आघाव, मुंबई जिल्हा सहकारी संस्था उपनिबंधक के.पी.जेबले, मा.राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव .संपत डावखर यांच्यासह सहकारी मजूर संस्थांचे पदाधिकारी रामदास मोरे, मुंबई शहर सहकारी मजूर संस्थांचे अध्यक्ष श्री.काशिनाथ ए शंकर, नागपूर मजूर संस्थांचे अध्यक्ष स्वप्नील लिखार आदी सहकारी मजूर संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

126904272 1765867386911009 7423974680860265992 n राज्यातील सहकारी मजूर संस्थांनी स्थानिकांना रोजगार देऊन कामात पारदर्शकता आणाडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

लोकमंगल फाऊंडेशन सोलापूर

आयोजित सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा
📷 विवाह दिनांक – 27 डिसेंबर 2020
📷 स्थळ – हरिभाई देवकरण,प्रशाला प्रांगण , सोलापूर
सोलापूर येथे आयोजित केला आहे. तरी ईच्छुक वधू वरांनी नाव नोंदणीसाठी संपर्क करावा.
संपर्क – लोकमंगल फौंडेशन 13 अ , सह्याद्री नगर , विकास नगर ,जुना होटगी नाका , सोलापूर
नाव नोंदणी अंतिम तारीख –
20 डिसेंबर 2020
फोन नं – (0217) 232240
मो – 9657709710

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update