fbpx
FB IMG 1621593637723 वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांनी व्यक्त केले. कोरोना संसर्गाबरोबरच म्युकर मायकोसिस आजाराने रुग्णांच्या चिंतेत आणखीच भर टाकली आहे. प्रामुख्याने हा आजार कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांत फैलावत असल्याचे आढळून येत आहे. हे एक फंगल इन्फेक्शन असून ते साधारणपणे नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करते. कोरोनातून बरे झालेल्या रूग्णांना हा आजार दोन ते सहा आठवड्यापर्यंत होऊ शकतो. म्हणून कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांनी आणखी काही दिवस काळजी घेणे गरजेचे आहे. वेळीच उपचार केले नसल्यास रूग्ण दगावण्याची शक्यता 50 टक्के असल्याचेही डॉ. मंठाळे यांनी सांगितले.
            कोरोना रूग्णांनी सकस आहार घ्यावा, कोवळ्या उन्हात थांबावे, व्यायाम, प्राणायम करावेत. पाणी भरपूर प्रमाणात प्यावे आणि सर्दी होणार असे पदार्थ खाणे टाळावे. मुबलक सूर्यप्रकाश आणि खेळती हवा असलेल्या ठिकाणी रहावे, असेही डॉ. मंठाळे यांनी सांगितले. मधुमेह रूग्णांनी काळजी घेणे आवश्यक आहे. 
आजाराची लक्षणे
·         नाक बंद पडणे, नाक गळणे, लालसर किंवा काळा स्त्राव येणे.
·         गालावर सूज येणे, बधीरपणा येणे.
·         तीव्र डोकेदुखी.
·         वरच्या जबड्यातील दात हलणे, जबड्यातील दात पडून पू येणे.
·         वरच्या जबड्याच्या टाळूला किंवा वरच्या भागाला छिद्र पडणे.
·         जबड्याची टाळू व नाकातील त्वचेचा रंग काळसर होणे.
·         नाकाच्या भागाला काळसर ठिपके पडणे.
·         डोळ्याच्या आजूबाजूला, सायनसच्या आजूबाजूचा भाग सुजणे.
                         वरील लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरकडून तपासून उपचार घ्यावेत.
 प्रतिबंधक उपाय
·         डॉक्टरांनी दिलेले औषधोपचार नियमित घेणे.
·         रक्तातील साखरेचे प्रमाण वारंवार रक्तातील साखर तपासून नियंत्रणात असल्याची खात्री करावी.
           रक्तातील साखर असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
·         डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नाकात बेटाकीन्ड रेडी 0.5 टक्के सोल्यूशनचे (पोविडन-आयोडिन) दोन
          ते तीन थेंब दिवसातून तीन-चार वेळा टाकावे.
·         बेटाकीन्ड रेडी नाकात टाकण्यापूर्वी सोल्सप्रे नसल स्प्रे किंवा नॅसोमिस्ट नसल ड्रॉप्स नाकात टाकावे.
·         बेटाकीन्ड रेडी किंवा बेटाडिन ओरल सोल्यूशनने दिवसातून दोनवेळा गुळण्या करणे.
·         माती आणि धुळीच्या थेट संपर्कात येऊ नये.
·         शेत, बगिचा किंवा बांधकामाच्या ठिकाणी संपूर्ण शरीर झाकले जाईल, असे कपडे घालणे.
·         त्वचेवर जखम असेल तर साबण आणि पाण्याने स्वच्छ करावे.
·         मास्कचा नियमित वापर करावा.
·         घरात बुरशी जमा होणार नाही याची काळजी घ्यावी.
·         वास येणारे, खराब अन्न टाकून द्यावे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update