En4yoULVgAEVzu8
Maharashtra निधन वार्ता

धाडसी लोकनेता हरपला पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची श्रद्धांजली

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पंढरपूर-मंगळवेढा तालुक्यातील जनतेप्रती आमदार भारतनाना भालके यांचे प्रेम होते. विधीमंडळात सामान्यांचे प्रश्न ते पोटतिडकीने मांडून न्याय मिळवून देत. सामान्य लोकांच्या प्रश्नांसाठी नेहमी झगडणारा धाडसी लोकनेता हरपला, अशा शब्दात पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी भारतनाना भालके यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

            भरणे यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे की, ‘आमदार भारतनाना भालके आणि आम्ही विधानसभेत एकत्र काम करीत होतो. मतदारसंघातल्या गावागावात, घराघरात त्यांचा जनसंपर्क होता. मतदारसंघातील दुष्काळी भागाला पाणी मिळवून देण्यासाठी ते सतत कार्यरत होते. लोकांच्या विकासासाठी ते तळमळीने काम करीत होते. शेतकरी, कष्टकरी, वंचित, उपेक्षित, समाजातल्या दुर्बल घटकांच्या विकासासाठी ते नेहमीच सर्वांच्या पुढे असायचे. त्यांच्या जाण्याने सोलापूर जिल्ह्याचे खूप मोठे नुकसान झाले आहे. एक धाडसी लोकनेता हरपल्याचे आम्हाला दु:ख आहे.’

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com