Technology

व्हाट्सअपची ही कमाल ट्रिक; पहा काय बदल झाले फिचर्स

नवी दिल्ली- व्हॉट्सअ‍ॅप सर्वाधिक वापरलं जाणारं इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अनेक जण आपलं ऑनलाईन स्टेटस हाईड ठेवतात. अनेक जण ऑनलाईन आल्याचं दिसू नये, यासाठी व्हॉट्सअ‍ॅपवर आलेला मेसेजही वाचत नाहीत. एखाद्याशी चॅटिंग करताना, इतरांना आपण ऑनलाईन आहोत, हे समजू नये यासाठी एक ट्रिक आहे. या ट्रिकद्वारे व्हॉट्सअ‍ॅपवर चॅटिंग करताना युजर ऑनलाईन दिसणार नाही.

पहिल्या पद्धतीत –

– यात स्मार्टफोनच्या नोटिफिकेशन विंडोचा वापर करता येईल. ज्यावेळी व्हॉट्सअ‍ॅपवर मेसेज येतो, त्यावेळी फोनवर त्याचं नोटिफिकेशन येतं.  जर तुमचा फोन जास्त जुना नसेल, तर मेसेजखाली रिप्ले चा पर्यायही मिळतो.

– या ऑप्शनमध्ये जाऊन, व्हॉट्सअ‍ॅप ओपन न करताच मेसेजला उत्तर देता येईल. असं केल्याने युजरच्या Last seen स्टेटसमध्ये कोणताही बदल होणार नाही. इतरांना तुम्ही ऑनलाईन आला आहात, याची माहिती मिळणार नाही.

दुसऱ्या पद्धतीमध्ये –

– स्मार्टफोनचा मोबाईल डेटा आणि वायफाय कनेक्शन बंद करावं लागेल. त्यानंतर WhatsApp ओपन करुन, त्या मेसेज किंवा चॅटवर जा, ज्याला Reply करायचा आहे. मेसेज टाईप करुन पाठवा, या परिस्थितीत मेसेज सेंड होणार नाही.

– आता व्हॉट्सअ‍ॅप बंद करा आणि स्मार्टफोनचं इंटरनेट पुन्हा सुरू करा. मेसेज सेंड होईल आणि तुम्ही ऑनलाईनही दिसणार नाही.

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com