Election Maharashtra Solapur City

मतदानादिवशी मिळणार सुट्टी, अथवा दोन तासांची सवलत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पंढरपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत सर्व मतदारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी मतदानादिवशी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत द्यावी, असा शासन निर्णय आज उद्योग ऊर्जा आणि कामगार विभागाने जारी केला. उद्योग ऊर्जा व कामगार विभागाचे अपसचिव डॉ. श्री. ल. पुलकुंडवार यांनी शासन निर्णय जारी केला आहे. त्या आदेशात असे नमूद केले आहे की,

            1) निवडणूक होणाऱ्या मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार/अधिकारी/कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाच हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी.

            2) सदर सुट्टी उद्योग, ऊर्जा व कामगार विभागांतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहिल. (उदा.खाजगी कंपन्या या मधील आस्थापना, सर्व दुकाने किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स,रिटेलर्स इ.)

            3) अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यांदीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी कमीत कमी दोन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित जिल्हाधिकाी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहिल. कोणत्याही परिस्थितीत मतदारांना मतदानासाठी किमान दोन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहिल.

            4) उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाअंतर्गत येणाऱ्या सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी/व्यवस्थापनाने वरील सूचनांचे योग्य ते अनुपालन होईल याची काटेकोरपणे खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, मालकांविरुध्द कारवाई करण्यात येईल.

            दरम्यान, भारत निवडणूक आयोगाने 27 मार्च 2021 च्या सकाळी सात वाजल्यापासून ते 29 एप्रिल 2021 रोजीच्या सायंकाळी साडेसात वाजेपर्यंत कोणत्यााही प्रकारचा एक्झिट पोल आयोजित करणे, प्रिंट अथवा इलेक्ट्रॉनिक मिडीयाद्वारे प्रसिध्द करणे यास मनाई करण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणुक अधिकारी भारत वाघमारे यांनी दिली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143