Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- प्रभाग क्रमांक ९ मधील येमुल आर्थोपेडिक सेंटर येथे आज भगवान मार्कंडेय महामुनी प्रतिमा पूजन करून कोरोना लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.या लसीकरण केंद्राचे उद्घाटन डॉ श्रीनिवास येमुल यांच्या हस्ते करण्यात आले.
भाजपा शहर चिटणीस नागेश सरगम म्हणाले नगरसेवक नागेश वल्याळ यांच्या संकल्पनेतून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्रमांक ९ येथे लसीकरण केंद्र उभारण्यात आलं आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रभागातील जास्तीतजास्त नागरिकांना लस मिळायला हवी. या अनुषंगाने प्रभाग क्रमांक ९ मध्ये कोरोना लसीकरण केंद्र सुरू केले आहे. ४५ वर्षांवरील नागरिकांना येथे लस देण्यात येईल. यावेळी नगरसेवक नागेश वल्याळ म्हणाले कोरोना पाश्वभूमीवर कोरोनाचे सर्व नियम पालन करीत या ठिकाणी लसीकरण केंद्र उभा करण्यात आले आहे नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सहित सर्व सुविधा उपलब्ध आहेत याप्रसंगी वल्याळ कुटुंबीय संदीप वल्याळ, तनिष्क वल्याळ, तसेच अक्षय गिराम, ऋषिकेश स्वामी, नवनीत पोला, डॉक्टर राठोड मॅडम, नर्स गायकवाड मॅडम व स्थानिक भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते आणि महापालिका अधिकारी व आरोग्य सेवेचे कर्मचारी उपस्थित होते.
#solapurcitynews