Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
विडी कामगार महिला लसिकरणापासून वंचित
सोलापूर- सोलापूर शहरात कोरोना रुग्ण कमी झाल्याने सर्व बाजारपेठा यंत्रमाग कारखाने, कृषी उत्पन्न बाजार समिती यासह विडी उद्योग सुरू झाले असून यात काम करणाऱ्या दोन अडीच लाखाहून अधिक कामगारांना शासनाच्या नियमांमुळे पुन्हा बेरोजगारी ला सामोरे जावे लागणारे परिस्थिती उद्भवली आहे. व्यापारी , कामगार, यासह वीडी कामगार महिला अजूनही मोठ्या प्रमाणात लसीकरणापासून वंचित राहिले आहेत. यावर पालिका प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी पालिकेचे माजी सभागृहनेते तथा ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी सोमवारी पालकमंत्री दत्तात्रय भरणे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर आणि पालिका आयुक्त पी शिवशंकर यांच्याकडे केली.
प्रशासनाच्या वतीने व्यापारी आणि कामगार वर्गाला रॅपिड अथवा आर टी पी सी आर चाचणी किंवा लसीकरण करून उद्योगधंदे सुरू करण्याची परवानगी दिली आहे मात्र अनेक आस्थापनावरील व्यापारी अथवा कामगार वर्ग पंचेचाळीस पेक्षाही कमी वयाची असल्याकारणाने लसीकरण होऊ शकत नाही. यासह वीडी कामगार महिला, घरेलू कामगार ,तसेच ज्या महिलांवर घरची जबाबदारी आहे अशा महिलांना त्वरित लसीकरण करण्याचे नियोजन करावे अशी मागणी नगरसेवक पाटील यांनी केले. सोलापूर शहरात अडीच लाखाहून अधिक कामगार रॅपिड अथवा आर टी पी सी आर चाचणी घेण्यास भीती पसरली असून वयाची अट असल्याकारणाने लसीकरण सुद्धा होऊ शकत नाही. शासनाचे नियम शिथिल होऊ शकत नाहीत मात्र शहर आणि जिल्ह्यात लसींची संख्या वाढविण्यात येऊन लवकरात लवकर सामान्य नागरिकांना हे लसीकरण होणे गरजेचे असल्याचे नगरसेवक सुरेश पाटील यांनी सांगितले.
हे वाचा- लोकमंगल पतसंस्थेत नवलबाई बोंदार्डे यांच्याकडून अन्नधान्य कीट वाटप
मागील दोन महिन्याच्या लॉकडाऊन मध्ये अत्यावश्यक सेवा म्हणून मेडिकल संबंधित तसेच किराणा भुसार मालाचे दुकाने, बाजार समिती भाजीपाला मार्केट येथील व्यापारी आणि कामगारांना व्यापार करण्याची सवलत देण्यात आली होती . फ्रंटलाईन वर्कर म्हणून आरोग्य सेवा, पोलीस , हॉस्पिटल मधील कर्मचारीना लस देण्यात आले होते. मात्र बाजार समितीतील आडत व्यापारी आणि कामगार किराणा दुकानदार आणि कामगार, विडी उद्योग आणि तोटा तयार करणाऱ्या महिला कामगार यांचा थेट संपर्क नागरिकांशी आणि यांच्या प्रत्येकाच्या कुटुंबाशी येत असतो. यासाठी या क्षेत्राशी निगडित असलेल्या व्यक्तींना लवकरात लवकर लसीकरण करण्यात यावे यासह प्रत्येक लसीकरण केंद्राला दररोज 500 डोस उपलब्ध करून द्यावे अशी मागणी नगरसेवक सुरेश पाटील यांनी पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि मनपा आयुक्तांना केली…
रोजंदारी कामगारांचा विचार व्हावा
फ्रंटलाईन वर्कर प्रमाणे विडी कामगार महिला , यंत्रमाग कामगार , घरेलू कामगार , विधवा महिला , किराणा भुसार व्यापारातील कामगार वर्गाला लसीकरण करावे. नियम व अटी मुळे या सामान्य नागरिकांना पुन्हा रोजंदारी चा प्रश्न निर्माण होऊ शकतो. आज पासून सुरु झालेल्या सर्व आस्थापनांवरील व्यापारी तसेच कामगारांना वेळ देऊन लसीकरणाची सोय करावी. अशी मागणी ही पाटील यांनी यावेळी केली
#solapurcitynews