Covid 19 Solapur City

सोलापूरात लसीकरण केंद्रावर लस शिल्लक; 45 पुढील नागरिकांनी फिरवली पाठ

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- लसीच्या तुटवड्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांत करोना लसीकरण थांबवण्यात आलं आहे. पुरेसा साठा आल्यानंतर पुन्हा लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. कोविड प्रतिबंधक लसीच्या तुटवड्यामुळं राज्यातील अनेक जिल्ह्यांत लसीकरण केंद्रे पूर्णपणे बंद करण्यात आली आहेत. पिंपरी-चिंचवडसह अनेक महापालिका, नगरपालिकांनी तसं स्पष्टही केलं आहे. परंतु सोलापूर शहरातील लस पुण्याला जात असल्याची तक्रार लोकप्रतिनिधीने केल्यामुळे गेल्या दोन दिवसांपासून बंद असलेली लसीकरण केंद्र पुन्हा सुरू झाले आहे. आश्चर्यकारक बाब म्हणजे मंगळवारी प्रत्येकी केंद्रावर 250 लस व बुधवारी 250 लस उपलब्द असल्याने आज सोलापूर शहरातील लसीकरण केंद्रावर अनेक लस शिल्लक असलेले दिसत आहे. प्रभागातील नागरिकांनी लस बुक न केल्याने लसी शिल्लक आहेत. आज सकाळपासून काही नगरसेवकांनी आपला प्रभाग पिंजून नागरिकांना लसीकरणासाठी आव्हान करत आहेत.

1 पर्यंत सोलापूर शहरातील लसीकरण उपलब्द माहिती
मोकाशी हॉस्पिटल- 36
दिप सुपर स्पेशालिटी- 191
देगाव नागरी आरोग्य केंद्र – 217
गांधींनाथ मेडिकल कॉलेज- 202
साबळे दवाखाना- 199
SGR आयुर्वेद कॉलेज- 138
शहर दवाखाना-220
जोडभावी नागरी आरोग्य केंद्र- 167
येमुल हॉस्पिटल- 4

          सोलापूरात दोन दिवसानंतर सुरू झालेल्या लसीकरणावर 45 पुढील व्यक्तींनी लस घ्यावे असे आव्हान नगरसेवक सुरेश पाटील यांनी दिले आहे. याच बरोबर 45 पुढील व्यक्तींच्या मनात भीती असल्याने नागरिक लस न घेणे पसंत करत आहे व 18 ते 45 वयोगटातील नागरिक लसीचे वाट पाहत बसले आहेत.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com