Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
उमेदच्या माध्यमातून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी जिल्हा परिषद आवारात भरणार रानभाज्या महोत्सव
सोलापूर- ग्रामीण भागातील लोकांना रानभाज्यांची माहिती असते परंतु शहरी भागातील लोकांना रानभाज्यांची माहिती अत्यल्प असते. सोलापूर शहरातील नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी तसेच रानभाज्यांचे आहारातील महत्त्व समजावे या उद्देशाने सोलापूर जिल्हा परिषदेने उमेद अभियानाच्या माध्यमातून दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी रानभाज्या महोत्सवाचे आयोजन केले आहे. उमेद अभियानाच्या माध्यमातून बचतगटांना सक्षम करण्यासाठी नेहमीच प्रयत्न केले आहेत.
ग्रामीण भागातील महिलांच्या उन्नतीसाठी हा रानभाज्या महोत्सव बचतगटांमार्फत भरविण्यात आल्याचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांनी सांगितले. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालयातील सभागृहात विविध बचतगटांच्या प्रतिनिधींची बैठक आयोजित करण्यात आली होती या प्रसंगी सीईओ स्वामी यांनी ही माहिती दिली. पावसाळा सुरू झाला की रानात, शेतात तांदूळजा, पाथरी, चिगळ,आघाडा, घोळ, माट, कडवंची, कुंदराची भाजी, कुरडू आदी रानभाज्या सोलापूर जिल्ह्यात उपलब्ध होतात. रानभाज्या या मुख्यत्वेकरून जंगलात (रानात), शेतांच्या बांधावर, माळरानात येतात. निसर्गात लागवड न करता या वनस्पती येताात. या भाज्या अतिशय पौष्टिक असतात. आरोग्य वर्धक आणि बहुगुणी असतात. यात कार्बोहायड्रेट, प्रोटिन, सॅपोजेनिन, सॅपोनिन, सोडियम,पोटॅशियम,कॅल्शियम असतं.
दिनांक 24 व 25 ऑगस्ट रोजी सकाळी आठ ते दुपारी 12 या वेळेत रानभाज्या विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. तसेच दुपारी 12 ते 3 यावेळेत रानभाज्यांची पाककृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत. तेंव्हा सोलापूर शहरातील नागरिकांनी या महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन स्वामी यांनी यावेळी केले. त्यामुळे शहरी नागरिकांना रानभाज्यांची माहिती व्हावी त्याचप्रमाणे बचतगटांना उत्पन्नाचे एक साधन उपलब्ध व्हावे या दुहेरी भूमिकेतून या महोत्सवाचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे यांच्या संकल्पनेतून आयोजन करण्यात आल्याची माहिती यावेळी सीईओ स्वामी यांनी दिली.
बैठकीस अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उमेद अभिनयाने सचिन चवरे, मडीवळी यांच्यासह उमेद अभिनयानातील कर्मचारी व बचतगटांचे प्रतिनिधी बहुसंख्येने उपस्थित होते.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143