Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- दिवसेंदिवस शहरात कोरोना संख्या वाढत असताना प्रभाग क्रमांक 3 घोंगडे वस्ती भाजी मार्केट येथे विनामास्क व सोशल डिस्टन्स चे उल्लंघन करून भाजी विकत आहेत. भवानी पेठ, घोंगडे वस्ती, शाहीर वस्ती, शेळगी आदी भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येत आहेत. जिल्ह्यातील कोरोना संख्या जास्त प्रमाणात वाढत असताना खेड्यातील शेतकरी भाजी विकण्यासाठी येत असतात. शहरात भाजी व अत्यावश्यक विक्रीसाठी कोरोना टेस्ट करून विक्रीस परवानगी देत असताना मात्र भवानी पेठेतील भाजी मार्केट येथे कोणीही मास्क, कोरोना टेस्ट व सोशल डिस्टन्स न पाळता भाजी विक्री करत आहेत. सदर भागात दररोज वर्दळ वाढत असताना त्या भागातील नागरिकांची तक्रार वाढली आहे. त्याचप्रमाणे भाजी विकण्यासाठी सकाळी 11 पर्यंत वेळ दिले असता उशिरापर्यंत भाजी विकत असल्याची तक्रार वाढत आहे. यासाठी मागिल लॉकडाऊन काळात संसर्ग वाढू नये यासाठी सदर मार्केट हे महापालिकेतर्फे जयभवानी मैदान येथे भरवले जात होते. त्यामुळे या भागात कोरोना संसर्ग कमी झाले होते. सोशल डिस्टन्स, मास्क, कोरोना टेस्ट, सॅनिटायझर आदी सर्व बाबींची दखल घेऊन जयभवानी मैदानात भाजी विक्रीसाठी परवानगी देण्यात आले होते. आता शहारासह जिल्ह्यात रुग्ण वाढत असताना मात्र कोणतेच उपाययोजना दिसत नसल्याचे चित्र आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुन्हा एकदा भाजी मंडई जय भवानी मैदानात हलवण्यात यावे अशी मागणी या भागातील नागरिक करत आहेत. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाल्यास आम्ही आंदोलन करू असा इशारा सुरेश पाटील यांनी दिले आहे.
आमच्या प्रभागात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी भाजी मंडई जय भवानी मैदानात हलवावे. मागिल लॉकडाऊन काळात दोन अंकी रुग्ण वाढत असताना नियोजनबद्ध काम सुरू होते परंतु आता तीन अंकी संख्या वाढत असताना भाजी घेण्यासाठी गर्दी वाढत आहे. नागरिकांच्या जीवाला धोका होऊ नये म्हणून त्वरित भाजी मंडई पुन्हा जय भवानी मैदानात सुरू करावे- नगरसेवक सुरेश पाटील
#solapurcitynews