electronic vehical solapur citynews
Electricity Maharashtra

कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- मुंबई महानगरपालिकेच्या कोहिनूर वाहनतळातील इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशनचे उद्घाटन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले. इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाल्यानंतर या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून चार्जिंग स्टेशन आणखी वाढविण्याची सूचना ठाकरे यांनी केली. आमदार सदा सरवनकर, मुंबई महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागाचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यावेळी उपस्थित होते. ठाकरे म्हणाले, वातावरणीय बदलाच्या आणि वाढत्या नैसर्गिक आपत्तींच्या पार्श्वभूमीवर प्रदूषण कमी करण्याच्या उद्देशाने मागील महिन्यात शासनाचे इलेक्ट्रिक वाहन धोरण जाहीर झाले. या धोरणास उत्तम प्रतिसाद मिळत असून शासनामार्फत पर्यावरण पूरक विविध धोरणे आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हे वाचासर्वसामान्यांना घरांचा लाभ मिळवून देण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांनी पुढाकार घ्यावा

मुंबईचे पहिले एकात्मिक सार्वजनिक वाहनतळ असलेल्या दादरमधील कोहिनूर वाहनतळात विविध सुविधांसह आशुतोष एन्टरप्राइजेसच्या माध्यमातून इलेक्ट्रिक वाहन चार्जिंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेच्या जी/उत्तर विभागामार्फत सुरू करण्यात आलेल्या या वाहनतळात चार डीसी आणि तीन एसी अशा दोन प्रकारचे सात चार्जर बसविण्यात आले आहेत. याद्वारे २४ तासात सुमारे ७२ वाहने चार्ज होऊ शकतील. यामध्ये दोन चाकी, तीन चाकी आणि चार चाकी वाहनांचा समावेश असेल. नागरिक ऑटोपार्क मोबाईल अँपद्वारे ऑनलाइन पार्किंग बुक आणि आरक्षित करू शकतात.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Facebook Page- https://www.facebook.com/solapurcitynews/
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com