Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- कोरोना संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून महाराष्ट्र शासनाने संचार बंदीचे आदेश निर्गमित करण्यात आले होते. सदर आदेशाची अंमलबजावणी सोलापूर शहरात लागू करण्यात आली आहे त्या अनुषंगाने त्या अनुषंगाने 16 मार्च ते 31 मार्च या कालावधीत सोलापूर शहरांमध्ये विनाकारण फिरणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांची वाहने ताब्यात घेण्यात आली होती. सदर ताब्यात घेण्यात आलेली वाहने दिनांक 5 जून रोजी पासून नियमानुसार दंड आकारून व कागदपत्रांची पडताळणी करूनच संबंधित वाहन मालकांना परत देण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त डॉ. वैशाली कडूकर यांनी दिले आहे. तरी संबंधित वाहन मालक यांनी आपली वाहने च्या पोलीस ठाणे मार्फत ताब्यात घेण्यात आली होती त्या पोलिस ठाण्यात संपर्क साधून वाहनाची कागदपत्रे दाखवून व नियमानुसार दंड भरून आपली वाहने ताब्यात घ्यावी असे आव्हान केले आहे.
#solapurcitynews