fbpx
WhatsApp Image 2021 04 23 at 5.57.36 PM सर्वांनी गाव केंद्रबिंदू ठेवून कार्य करावेः आ. सुभाष देशमुख
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

कोरोनाच्या संकटात एकजुटीने काम करण्याचे आवाहन

सोलापूर सोशल फाऊंडेशन आयोजित झूम मीटिंगद्वारे समृद्ध गाव अभियानाबाबत चर्चा

सोलापूर- शासनाच्या विविध योजनांची माहिती घेऊन गावात मंदिर, शाळा बांधकाम दुरुस्ती, रस्ते दुरुस्ती करण्याचे नियोजन करावे. यासाठी 15 वा वित्त आयोग, शासनाकडे पाठपुरावा करण्यास सोलापूर सोशल फाउंडेशन सहकार्य करेल, सर्वांनी गाव केंद्रबिंदू ठेवून कार्य करावे, असे प्रतिपादन आ. सुभाष देशमुख यांनी केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर सोशल फाऊंडेशनतर्फे झूम मीटिंगद्वारे समृद्ध गाव अभियान तालुकास्तरीय समिती सदस्यांसमवेत चर्चासत्र’ पार पडले. संस्थापक अध्यक्ष आ. सुभाष देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली ही सभा झाली.
                       आ. देशमुख म्हणाले की, नवनियुक्त सरपंच, सदस्यांना प्रशिक्षण देण्यास सोलापूर सोशल फाउंडेशन सहाय्य करेल. आपल्या गावातील ऐतिहासिक, धार्मिक, ग्रामदैवत, विविध उत्पादन, प्रक्रिया उद्योग, शेती पूरक व्यवसाय, राज्य सरकार च्या विविध योजना ची माहिती घेऊन गावाला फायदा करून द्यावा, गावातील वक्ते, कीर्तनकार, प्रवचनकार याविषयी माहिती फाउंडेशन पर्यंत पोहोचवल्यास त्यास प्रसिद्धी देण्यासाठी सहाय्य केले जाईल. कृषी पर्यटन केंद्र, महिला उद्योग मार्फत रोजगार निर्मितीसाठी प्रयत्न व्हावेत, गावाचा प्रारूप आराखडा तयार करून औद्योगिक कंपनी कडे सादर करावा, जिल्हा पहिल्या 5 मध्ये कसा येईल यासाठी सर्वजण मिळून काम करावे यासह विविध विषयांवर त्यांनी मार्गदर्शन केले.

Solapur City News 2 2 सर्वांनी गाव केंद्रबिंदू ठेवून कार्य करावेः आ. सुभाष देशमुख


                       समन्वयक विजय कुचेकर यांच्या प्रस्तावनेने या चर्चासत्राचा प्रारंभ झाला. तसेच सल्लागार मोहन अनपट यांनी समृद्ध गाव समिती बाबत मार्गदर्शन केले. सल्लागार अजित यलमार (कंडरे) यांनी सोलापूर सोशल फाऊंडेशन तर्फे सुरू असलेल्या कामांची माहिती दिली. या मिटिंगसाठी सल्लागार मोहन अनपट,गजानन भाकरे, अजित यलमार (कंडरे), सुशील शिरसागर, पांडुरंग वाघमोडे, अमित कुमार जैन , प्रा. नरेंद्र काटीकर, शहाजी देशमुख, आशिष बिराजदार, गोविंद विभुते, मुख्य समन्वयक विजय पाटील, विपुल लावंड, विजय कुचेकर, लखन वाघमारे उपस्थित होते. तसेच समृद्ध गाव सदस्य युवराज गंभीरे, विनायक सुतार, श्रीमंत बंडगर, पंडित मिरगणे, अप्पू शिरगुर, शंभू माने, जगन्नाथ गायकवाड ,जितेंद्र खोत, अमित तांबोळी, समंथा कोळेकर, तानाजी विरकर, सिताराम धुमाळ, सोमनिंग, सुनील नरोटे, सुरेश पाटील, विजय लोंढे, संजीव खिल्लारे, जितेंद्र खोत, गणेश झाडे, हरिचंद्र राठोड, मधुकर पाटील, महेश बगले, मारुती शिंदे, नागेश कोकरे, पांडुरंग घोलप, अशोक जाधवर, आनंता चव्हाण, डॉ. संतोष दळवी, दशरथ उकरंडे, गणेश पाटील,नागेश स्वामी, तानाजी इरकर, पांडुरंग घोलप, सीताराम धुमाळ,प्रशांत माळवदे, अशोक जाधवर, गणेश झाडे, मधुकर पाटील आदी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update