Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
चिंचणी- गावच्या विकासाठी सर्वांनी एकत्र येत प्रयत्न केले तर गाव नक्कीच समृद्ध होणार आहे. सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या समृद्ध गाव या संकल्पने नुसार चिंचणी या गावाची विकासात्मक वाचाल सुरु असून, चिंचणी गावाप्रमाणे आपले गाव देशाच्या नकाशावर येण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन आ. सुभाष बापू देशमुख यांनी केले. चिंचणी ता. पंढरपूर येथे विविध विकास कामांच्या भूमी पूजन व उदघाट्न कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी माढा विधानसभाचे आ. बबनदादा शिंदे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होते. त्याच बरोबर प्रणव परिचारक, समाधान काळे,दिनकर नाईकनवरे, मयुरी वाघमारे, अजित कंडरे, मोहन अनपट, विजय पाटील, बाळासाहेब विजय कुचेकर, कौलगे,बीडीओ पिसे,उप अभियंता डी डी कांबळे,उप अभियंता सुदीप चमारिया,अजिंक्य साबळे कपिले, शशिकांत सांवत,चंद्रकांत पवार,ज्ञानेश्वर सावंत, शिवाजी अनपट,हणमंत खर्चे,गोपाळ जाधव,मचिंद्रनाथ पवार,तुकाराम जाधव, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.
आ. सुभाष बापू देशमुख यांनी सरकार मध्ये मंत्री असताना विशेष तरतुदी अंतर्गत चिंचणी गावाला एक कोटी अठरा लाख इतका भरीव निधी दिला होता. त्यां अंतर्गत जि. प. शाळा, पिण्याच्या पाण्याची पुरवठा विहीर, पंपगृह , गावाचा 2 किमी लांबीचा डांबरी रस्ता, उघडी गटारे अशी विकासात्मक कामे करण्यात आली आहेत. या कामाशिवाय आज ओपन जिम, अभ्यासिका, रेस्ट हाऊस आदी विकास कामांचे उदघाट्न मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चिंचणी हे विकासाचे आदर्श मॉडेल होत असून भविष्यात कृषी पर्यटन म्हणून हे गाव विकसित करावे, त्यामुळे गावातील लोकांना गावातच रोजगार उपलब्ध होईल. शहरातील पैसा त्यामध्यमातून गावात येईल व गावाचा विकास होण्यासाठी मदत होईल. यासाठी आपण सदैव सोलापूर सोशल फाऊंडेशनच्या माध्यमातून विविध प्रकारे मदत करत राहू असे आ. सुभाष बापू देशमुख यांनी गावाकऱ्यांना आश्वासित केले.
#solapurcitynews
जाहिरात–
डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143