128146024 1275763056121722 5571112043970971835 o
Economy Maharashtra

तिर्हे ग्रामस्थांची भविष्यातील गैरसोय टाळण्याची मागणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर – चुकीच्या ठिकाणी बोगदा करण्या ऐवजी तिर्हे ग्रामस्थांच्या मागणीनुसार बोगदा करून तिर्हे येथील नागरिकांची गैरसोय टाळावी अशी मागणी निवेदनाद्वारे ग्रामस्थांनी केली असून मागणीचा विचार न झाल्यास ग्रामस्थांनी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तिर्हे ता.ऊत्तर सोलापुर येथे पुलानजीक गावातील लोकांना ईकडून-तिकडे जाणेकरीता बोगद्याचे काम सुरु असुन ते चुकीचे ठिकाणी होत आहे.गावकरीच्या सोईचे दृष्टीने ऊड्डाणपुलाला बोगदा हा जुनी एसटी स्थानकाचे जवळ हिरज तिर्हे पाथरी या रस्तावर होणे गरजेचे आहे.रोडचे दोन्ही बाजुला गाव वसले असुन दैनंदिन सोईकरीता ह्याच ठिकाणी बोगदा होणे गरजेचे आहे.याबाबत दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख यांना ग्रामस्थाचे वतीने निवेदन देण्यात आले.
                      सदरील बोगदा हा ग्रामस्थांचे गैरसोईचा असुन बहुतांश लोक जुन्या बसस्थानकाच्या बाजुला रहात आहेत.त्यांना गावात जाणेकरीता हिरज तिर्हे पाथरी ह्या रस्तावर बोगदा होणे गरजेचे आहे.आत्ता सिना नदीपुलाजवळ जे बोगद्याचे काम सुरु आहे ते शिवणी व पाथरी वरुन येणारे लोकासाठी आहे.तिर्हे ग्रामस्थासाठी ते गैरसोईचे आहे.तसेच परवा सिना नदीला आलेल्या पुराचे वेळी हा प्रस्तावित बोगदा सुध्दा पाण्याखाली गेला होता.त्यामुळे ग्रामस्थाचे सोईकरीता बोगदा हा जुन्या बसस्थानकाशेजारील हिरज तिर्हे पाथरी रस्तावर होणे गरजेचे आहे.राज्य महामार्ग व्हायला आमचा विरोध नाही पण चुकीचे पध्दतीने काम होत असेल व ते पण ग्रामस्थाचे गैरसोईचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनीधीना भेटुन यातुन काहीतरी मार्ग काढण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे मत तिर्हे गावचे माजी उपसरपंच भारत जाधव यांनी व्यक्त केले आहे.
                          याप्रसंगी भारत जाधव,रामकाका जाधव,संदिप सुरवसे,पार्थविर सुरवसे,तुकाराम पवार आदि उपस्थित होते.याबाबत प्रकल्प संचालक कदम यांचेशी ही पत्रव्यवहार करण्यात आला असुन त्यांना ही भेटुन निवेदन देण्यात आले आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

WhatsApp Image 2020 09 24 at 4.32.07 PMडिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com