Solapur City News 49
Covid 19 Health Maharashtra

कोवीड १९ नियमांचे उल्लंघन केल्यास कोविड संपेपर्यंत आस्थापना सील राहणार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

महापालिकेस सहकार्य करण्याचे महापौर-आयुक्तांचे आवाहन
ठाणे –  कोणतीही आस्थापना किंवा व्यवसाय बंद करणे ही महापालिका प्रशासनाची भूमिका नाही पण केंद्र आणि राज्य सरकारच्या कोवीड १९ नियमांचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासन जोपर्यंत कोविड १९ महामारी संपल्याचे जाहिर करीत नाही तोपर्यंत संबंधित आस्थापना बंद करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करून सर्व आस्थापनाधारकांनी महापालिकेस सहकार्य करून आस्थापना सील करण्याची वेळ येवू देवू नका असे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले आहे. आज दुपारी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरातील हॅाटेल असोसिएशन, थिएटर असोसिएशन, मॅाल्सधारक, मंगल कार्यालय असोसिएशन आणि इतर आस्थापनांचे पदाधिकारी यांच्यासमवेत महापालिका भवन येथील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहामध्ये विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीमध्ये केंद्र आणि राज्य शासनाच्या निर्बंधांविषयी सर्व पदाधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. यामध्ये सिनेमागृहे, हॅाटेल्स-रेस्टॅारंटसमध्ये ५० टक्के क्षमतेने सुरू ठेवतानाच मास्क वापरणे, प्रत्येकाचे तापमान तपासणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आदी निर्बंध पाळणे बंधनकारक आहे. मॅालमध्येही मास्क वापरणे, प्रत्येकाचे तापमान तपासणे, सॅनिटायझरचा वापर करणे, सुरक्षित अंतर राखणे आदी निर्बंध पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. त्याचबरोबर कोणत्याही सामाजिक, धार्मिक, राजकीय तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी देण्यात येणार नसून लग्न समारंभासाठी केवळ ५० लोकांनाच परवानगी देण्यात येणार आहे तर अंत्यविधीसाठी केवळ २० लोकांनाच परवानगी देण्यात येणार असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. या निर्बंधाबरोबरच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली गृहविलगीकरण करणे, १४ दिवसांसाठी गृह विलगीकरण असल्याबाबतचा माहिती फलक संबंधित घरावर लावणे, कोविड पॅाझिटीव्ह रूग्णांच्या हातावर क्वारंटाईनचा शिक्का मारणे आदी सूचनाही या मार्गदर्शक सूचनांमध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून त्याची कठोर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. विविध आस्थापनांकडून या निर्बंधाचे उल्लंघन झाल्यास केंद्र शासनाकडून कोवीड १९ ची महामारी संपल्याचे जाहिर होत नाही तोपर्यंत संबंधित शॅापिंग मॅाल्स, आस्थापना, मंगल कार्यालये, हॅाटेल्स बंद करण्यात येतील असे स्पष्ट करण्यात आले. कोणताही व्यवसाय किंवा आस्थापना बंद करण्याची महापालिका प्रशासनाची भूमिका नाही किंवा इच्छाही नाही पण केंद्र आणि राज्य शासनाच्या आदेशाचे उल्लघंन झाले तर कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ही कारवाई करण्यात येईल असे सांगून महापालिकेस सहकार्य करून ही वेळ येवू देवू नका असे आवाहन यावेळी महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143