Voter name registration started
Election Solapur City

काय सांगता ! मतदार नाव नोंदणी सुरू झाली ?

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

मुंबई-  भारत निवडणूक आयोगाने दिनांक 1 नोव्हेंबर 2021 ते दिनांक 30 नोव्हेंबर 2021 या कालावधीत विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम (Special Summary Revision Programme) जाहिर केला आहे. या कार्यक्रमांतर्गत सदर कालावधीत नवीन मतदारांची नोंदणी करणे/ मतदारांच्या नाव, पत्ता, फोटो यामध्ये दुरुस्ती करणे आणि मयत, दुबार व स्थलांतरित मतदारांची वगळणी इ. बाबत कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग मतदार, महिला आणि समाजातील वंचित घटकांतील मतदारांची जास्तीत जास्त मतदार नोंदणी होण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. तसेच मतदारांची नावे समाविष्ट करण्यासाठी दि. 13 व  14 नोव्हेंबर, २०२१ आणि दि. 27 व  28 नोव्हेंबर, 2021 रोजी विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे.

शालेय शिक्षणातील सुधारणांसाठी नामांकित आयटी कंपन्यांच्या सहकार्याने राज्य शैक्षणिक तंत्रज्ञानाचे मंच स्थापन करणार

तरी मुंबई शहर जिल्ह्यातील नव मतदारांनी व नागरिकांनी जवळच्या पदनिर्देशित ठिकाणी अथवा www.nvsp.in या वेबसाईट वर अथवा Voter Helpline App द्वारे मतदार यादीत आपले नाव नोंदणी करावी, असे आवाहन श्री. राजीव निवतकर, जिल्हाधिकारी, मुंबई शहर यांनी केले आहे.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews