Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
सोलापूर- सोलापूरात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने रुग्णांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. यावर उपाययोजना म्हणून प्रशासन लसीकरण जलदगतीने करा असे आव्हान करत असताना मात्र लसीकरण केंद्रावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होत आहे. शहरात वयोवृद्धांना लस उपलब्ध होत नसल्याने नाहक त्रास सहन करावा लागत आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया भाजप युवा मोर्चाचे अक्षय अंजिखाने यांनी व्यक्त केले. या लस तुटवड्याबाबत भारतीय जनता युवा मोर्चेच्या वतीने सभागृह नेते श्रीनिवास करली व महापौर श्रीकांचना ताई यन्नम यांना भेटून विविध मागण्या करण्यात करण्यात आले.
हे वाचा- लोकमंगल बँकेच्या वर्धापन दिनानिमित्त 51 जणांचे रक्तदान
प्रभाग तिथे लसीकरण केंद्र सुरू करावे, गर्दी टाळण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाईन नोंदणी केलेल्या नागरिकांची केंद्र वेगळी करावी, लसीकरण केंद्र सुरू करण्यासाठी स्वयंसेवी संस्थेला परवानगी द्यावी, लसी उपलब्ध नसल्यास नागरिकांना महापालिकेकडून कळविण्यासाठी यंत्रणा राबवावे असे अनेक मागण्या यावेळी मांडण्यात आले. याप्रसंगी यतीराज होनमने, ओम होमकर, योगेश कबाडे, रोहित कोळकुर, शिवानंद येरटे, रोहित इटगी आदींची उपस्थित होती.
#solapurcitynews