IMG 20210414 WA0004
Health Solapur City

एकाच पावसात वाहून गेली नाल्याची संरक्षण कठडा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

दिवस उजाडला तरी नाल्यातील कचरा कोणी उचलेना
सोलापूर- काल झालेल्या अवकाळी पावसामुळे सोलापूर शहरात अनेक ठिकाणी हाहाकार माजवला होता. परंतु अचानक आलेल्या पावसामुळे प्रशासन जागे होण्या ऐवजी दुसऱ्या दिवशीही कोणतेच पावले न उचल्याचे दिसून आले आहे. शहरातील मैलमिश्रित पाणी हे सर्वात जास्त साखरपेठ शॉपिंग सेंटर, कुंभारवेस बस स्टॉप, कुंभारवेस पेट्रोल पंप, अहिल्यादेवी मंगलकार्यालय, विश्रांती चौक, पाणी गिरणी, रुपाभवानी मंदिर आदी भागात मोठ्या प्रमाणात पाणी वाहतो. संपूर्ण शहरातील कचऱ्यासह पाणी आल्याने मिळेल त्या ठिकाणी कचरा बाहेर पडत पाणी वाहत जात असल्याने या भागात कचरा व माती रस्त्यावर आलेले पहावयास मिळाले.

IMG 20210414 WA0003
रात्री अचानक आलेल्या पावसाने कुंभारवेस नाल्यावरील संरक्षण कठडा देखिल उखडून पाण्याने वाहून गेले आहे. सर्व नाल्याजवळील रस्ते खाली असल्याने पाणी रस्त्यावरून वाहत असताना दिसत आहे. कुंभारवेस नाल्यावरील रस्त्याचा दर्जा खराब झाल्याने पुढील काळात रास्ता तुटण्याची शक्यता आहे. त्या शेजारी असलेल्या भागात संरक्षण भिंत अथवा लोखंडी कठडा नसल्याने जिवीतहानी होण्याची शक्यता आहे.

संपूर्ण महापालिकेची यंत्रणा ही कोव्हिड मध्ये गुंतली असली तरी अनेक वेळा दुसरी आपतकालीन यंत्रणा सज्ज ठेवणे गरजेचे आहे. असे असताना दिवस उजाडला तरीही कोणतेच हालचाली पालिकेकडून झाली नसल्याचे दिसून आले आहे. आज महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त काही कामगार सुट्टीवर असल्याने उशिराने कामे होणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

Digital Media
Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com