Economy Maharashtra

झेप प्रतिष्ठान तर्फे कचरावेचक महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
ठाणे –  झेप प्रतिष्ठान तर्फे मुलुंड येथील डम्पिंग ग्राउंड येथील कचरावेचक महिलांना सॅनिटरी पॅडचे वाटप करण्यात आले. ठाणे- मुलुंड शहरातील कचरा जिथे एकत्र केला जातो त्या कचऱ्यावर उदरनिर्वाह करणाऱ्या या कचरावेचक महिलांना मासिक पाळी दरम्यान घेतल्या जाणाऱ्या आरोग्याच्या काळजीविषयक महत्त्वपूर्ण माहिती तसेच त्यांना वर्षभर पुरेल इतके सॅनिटरी पॅड झेप प्रतिष्ठान तर्फे वाटण्यात आले.आपल्या परिसराच्या स्वच्छतेची काळजी घेणाऱ्या या महिलांच्या आरोग्याची काळजी घेण्याची संधी झेप प्रतिष्ठानला मिळाली असे झेप प्रतिष्ठानचे विकास धनवडे यांनी सांगितले. त्याच सोबत मासिक पाळी दरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, सॅनिटरी पॅडची विल्हेवाट कशी लावावी यावर ही मार्गदर्शन करण्यात आले. पहिल्या टप्प्यात या महिलांना 3 महिने पुरेल इतके पॅड देण्यात आले. त्यानंतर पुन्हा त्यांच्या आरोग्याची माहिती घेऊन त्यांना प्रत्येक 3 महिन्यांनी हे वाटप करण्यात येईल. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता हा उपक्रम अत्यंत कमी वेळात आणि सोशल डिस्टन्सचे नियम पाळत करण्यात आला.या उपक्रमासाठी मदत करणाऱ्या सर्व दानशूर व्यक्तींचे आभार झेप प्रतिष्ठानच्या प्रत्येक सदस्यांनी तसेच डम्पिंग ग्राउंड वरील महिलांनी आभार मानले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143