Environment

बाणगंगा तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबत कार्यवाही करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई-  बाणगंगा तलाव प्रदूषित होत असल्याबाबतच्या तक्रारी येथील स्थानिक रहिवाशांनी दिल्या असल्याने पुरातत्व संचालनालयाने या तलावातील जल प्रदूषण थांबविण्याबाबतची कार्यवाही करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख यांनी  दिले आहेत. मलबार हिल येथील बाणगंगा तलावातील जल प्रदूषणासंदर्भात बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी पुरातत्व संचालनालयाचे संचालक तेजस गर्गे उपस्थित होते. सांस्कृतिक कार्यमंत्री. देशमुख म्हणाले, उच्च न्यायालयाने बाणगंगा तलावासंदर्भात काही निर्देश दिले असून या निर्देशाचे पालन करण्यात यावे. तसेच हा तलाव जल प्रदूषित होणार याची काळजी घेण्यात यावी.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143