Environment

नवीन पोलीस वसाहतीची 9 वर्षातच दुरवस्था, पाणी समस्या,घरात लिकेज समस्या

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पोलीस पत्नींनी समस्यांबाबत घेतली पोलीस आयुक्तांची भेट
ठाणे – ठाण्यातील खारकर आळी येथील नवीन पोलीस वसाहतीतील पोलिसांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असल्याने पोलीस पत्नीनी या समस्या लवकर लवकर दूर व्हाव्यात यासाठी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेतली. ठाण्यातील खारकर आळी परिसरातील जुनी पोलिस वसाहत अतिशय जीर्ण झाल्यानंतर त्या जागेवर नवीन पोलिस वसाहत उभारण्यात आली.या प्रकल्पाअंतर्गत पाच रहिवाशी इमारती बांधून झाल्यानंतर २०१२ साली राज्याचे तत्कालीन गृहमंत्री आर.आर. पाटील यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन करण्यात आले. आता अवघ्या नऊ वर्षातच या इमारतीची दुरवस्था होत असल्याचे समोर आले आहे. या ठिकाणी असलेल्या भास्कर, आदित्य,अरुण, रवी आणि सूर्या या पाच इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना पाणी समस्या तसेच घरात होत असलेल्या लिकेज समस्येला सामोरे जावे लागत आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला वारंवार तक्रारी करूनही दुर्लक्ष होत असल्याने अखेर संतप्त झालेल्या पोलीस पत्नी संघटनेने सोमवारी पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांची भेट घेऊन समस्या मांडल्या.याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाने या सर्व प्रकाराची त्वरित दाखल न घेतल्यास

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143