way truth Prophet Mohammad
Solapur City Religious

ज्यांनी दाखवले जगाला सत्याचा मार्ग ते म्हणजे मोहम्मद पैगंबर- नगरसेवक तोफिक शेख

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- पैगंबर हजरत मुहम्मद सल्ल्लाहू अलैही वसल्लम यांचा अरब देशातील पवित्र मक्का शरीफ या गावी कुरैश या कुटुंबात जन्म झाला. त्यांनी वयाच्या चाळीसव्या वर्षी आपण पैगंबर असल्याचे जाहीर केले. त्यांच्या जन्मापूर्वी अरब देशातील जनतेवर अत्याचार होत होते. अज्ञानापायी अरब लोक मुलगी जन्माला आली की, तर तिला जिवंत दफन करत असत. स्त्रियांचा व विधवांचा छळ करून त्यांच्यावर अत्याचार केले जात असत. पैगंबर मुहम्मद यांच्यामुळे अत्याचाराचे हे पर्व संपुष्टात येण्यास प्रारंभ झाला.

हे वाचाप्रभाग क्र. 24 मध्ये आ. देशमुख यांच्या हस्ते विकासकामांचे उद्घाटन

           विधवा स्त्रियांवर होत असलेले अत्याचार थांबविण्यासाठी त्यांनी आपल्या वयापेक्षा अधिक वय असलेल्या उम्मूल मेमिनुल हजरत खदीजतुल कुबरा या नावाच्या विधवेशी लग्न केले. इतरांना मार्गदर्शन, उपदेश व आदेश करण्यापूर्वी सर्वप्रथम स्वतः आचरण करणे हा त्यांचा विशेष स्वभावगुण होता. मनमिळावू, सभ्यता, विनम्रता, प्रेमळ स्वभाव, शत्रूंना माफ करणे, द्वेषभावना न बाळगणे आदी विशेष गुण त्यांच्यात होते. त्यांच्या तोंडून विरोधकांविषयी कधीही अपशद्ब निघाले नाही. उलट ते त्यांच्याशी प्रेमानेच वागले, बोलले. सर्वश्रेष्ठ अल्लाहताअलाच या सृष्टीचा निर्माता आहे. त्याच्याइतका कोणीही श्रेष्ठ नाही, असे ते अपल्या प्रवचनातून उपदेश करीत असत. कितीही कठीण प्रसंग आले, तरी सत्याचा मार्ग सोडायचा नाही असे ते सांगत. वयाच्या ६३ व्या वर्षी त्यांनी जगाचा निरोप (परदा) घेतला. त्यांनी दाखवून दिलेला सत्याचा मार्ग, त्यांनी केलेल्या उपदेशांवर प्रामाणिकपणे आचरण, त्यांच्या पावलावर पाऊल टाकून चालण्याचा संकल्पच पैगबरांप्रती खरी श्रद्धा ठरेल. तसेच त्यांचा सच्चा अनुयायी होण्याचा गौरव प्राप्त होईल. एका अर्थाने पैगंबर मुहम्मद यांची साजरी करण्याचे सार्थक होईल. अशा शब्दात नगरसेवक तोफिक शेख आपले विचार व्यक्त केले

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143