Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
नवी दिल्ली Weather- येत्या तीन दिवसात हरियाणा, चंदीगड आणि उत्तर राजस्थानात थंडीची लाट येण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पंजाबसह आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात येत्या काही दिवसात सकाळी मोठ्या प्रमाणात धुकं पडण्याची शक्यता आहे. यामुळे पहाटे प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे वाहन चालकांना विशेष काळजी घेण्याचा सल्ला हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. महाराष्ट्रात देखील पुढील पाच दिवस कोरडं हवामान राहणार आहे. गेल्या चोवीस तासात मुंबईत मात्र किमान तापमानात 1 ते 2 अंश सेल्सिअस तापमानाची घट झाली आहे. गेली बरीच दिवस तापमानाचा पारा चढाच राहिल्यानंतर, मुंबईत थंडीची चाहूल लागली आहे.
म्हणून एटीएममधून पैसे काढण्याचे बदलले नियम
डिसेंबर महिन्यातील दोन आठवडे संपल्यानंतरही देशात अपेक्षित (Weather) थंडी पडली नाही. दिल्लीत तापमानाचा पारा 8 अंशावर गेल्यानंतर पुन्हा एकदा राजधानीत किमान तापमान वाढलं आहे. तर पंजाब मात्र कडाक्याच्या थंडीनं गारठलं आहे. पश्चिमी वाऱ्यांच्या प्रभावामुळे पंजाबमध्ये थंडीची लाट आली आहे. पुढील पाच दिवस पंजाबमध्ये थंडी कायम राहण्याची शक्यता आहे. सध्या पश्चिमेकडील वाऱ्याच्या प्रभावामुळे जम्मू काश्मीर आणि आसपासच्या परिसरात चक्रीय (Weather) वाऱ्याची स्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम पुढील तीन दिवसात जम्मू काश्मीर, लडाख, गिलगीट, बाल्टीस्तान, मुझफ्फराबाद, आणि हिमाचल प्रदेशात अनेक ठिकाणी हिमवर्षावासह (Weather) पावसाची शक्यता आहे. तसेच उद्या उत्तर पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी कोसळण्याची शक्यता आहे.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews