Economy

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विमानतळावर स्वागत

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नागपूर- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे विशेष विमानाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज दुपारी सव्वातीन वाजता आगमन झाले. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे त्यांच्यासमवेत उपस्थित होते. महापौर दयाशंकर तिवारी, सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम, खासदार कृपाल तुमाने, आमदार आशिष जैस्वाल, विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार, महापालिका आयुक्त राधाकृष्णन बी., जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, नागपूर महानगर विकास प्राधिकरणाच्या आयुक्त शीतल तेली-उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, पोलीस अधीक्षक (ग्रामीण) राकेश ओला, डॉ. बसवराज तेली, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देत स्वागत केले. स्वागत स्विकारल्यानंतर मुख्यमंत्री ठाकरे यांनी गोरेवाडा येथील बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानाकडे प्रयाण केले.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143