fbpx
download 1
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली- केंद्र सरकारने येत्या 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वाचे लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. लसीकरणाच्या मुद्द्यावरून आता राजकारण तापलं असून कॉंग्रेस आणि भाजपमध्ये शाब्दिक युद्ध सुरू आहे. प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसने या मुद्द्यावरून केंद्र सरकारवर टीका केली आहे. केंद्र सरकार 45 वर्षाच्या आतील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी झटकत आहे असा आरोप काँग्रेसने केला आहे. 
        यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम म्हणाले की, केंद्र सरकारनं लसीकरणाबाबत सकारात्मक धोरण आखणं गरजेच आहे. सध्या केंद्राने जो निर्णय घेतलाय तो प्रतिगामी आणि चुकीचा आहे. पी. चिदंबरम यांच्या मते, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयानुसार, 45 वर्षाखालील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी आणि त्याचा खर्च आता राज्यांवर येणार आहे. आधीच केंद्राने राज्यांच्या आर्थिक अधिकारांवर घाला घातला आहे. जीएसटीमुळे राज्यांचा महसूल कमी झाला आहे त्यामुळे राज्यांकडे आता मर्यादित संसाधने उरली आहेत. त्यातच आता लसीकरणाचा खर्चही त्यांचावर टाकण्यात येत आहे असाही आरोप पी. चिदंबरम यांनी केला आहे. पक्षाचे वरिष्ठ नेते जयराम रमेश म्हणाले की, “मोदी सरकार एक राष्ट्र, एक कर आणि एक राष्ट्र, एक निवडणूक या गोष्टीवर विश्वास ठेवते. पण लसीकरणाच्या बाबतीत एक राष्ट्र, एक किंमत या गोष्टीवर विश्वास नाही ठेवत.” त्यांनी असाही दावा केला आहे की, केंद्र सरकारच्या आणि राज्य सरकारच्या तसेच खासगी हॉस्पिटलमध्ये कोरोनाच्या लसींची किंमत वेगवेगळी असेल. त्यामुळे अनेक दुर्बल घटकांना लस घेता येणार नाही. 
               काँग्रेस नेते राहुल गांधींनीही मंगळवारी ट्विटच्या माध्यमातून केंद्र सरकारवर टीका केली आहे. त्यामध्ये म्हटलं होतं की, “18 ते 45 वर्षामधील लोकांना कोणतीही मोफत लस मिळणार नाही. लसीच्या या किंमतीवर नियंत्रण ठेवायचं सोडून यामध्ये दलालांना वाव देण्यात आला आहे. दुर्बल घटकाला लस मिळेलच याची कोणतीही शाश्वती नाही. केंद्र सरकारचे लसीकरणाचे धोरण हे भेदभाव करणारे आहे

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update