Crime Maharashtra Solapur City

कोरोना काळातील विद्यार्थी, बेरोजगार युवकांवरील नोंद “फौजदारी गुन्हे तात्काळ मागे घ्या- आमदार प्रणिती शिंदेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर- मार्च 2020 पासून राज्यात कोरोना महामारीचा प्रलय सुरु असून यामध्ये लॉकडाऊनमध्ये विद्यार्थी व सुशिक्षित बेरोजगार तरुणांवर 188 कलमान्वये गुन्हे दाखल झाले आहेत. यामुळे सदर युवकांना नोकरीच्या ठिकाणी, पासपोर्ट व सर्वच ठिकाणी चारित्र पडताळणीच्या वेळी गुन्हेगार असल्याचे दर्शवून अडथळा होत आहे. सोलापूरातील तरुणांना नोकरीच्या वेळेस यामुळे मोठी अडचण होत असून नोकरीमध्ये निवड झालेल्या तरुणांना नोकरी गमवावी लागली आहे. खरेतर कोरोना ही नैसर्गिक आपत्ती असून या काळात जीवनावश्यक गरजांकरीता घराबाहेर पडलेले तरूण हे निश्चितच सराईत गुन्हेगार, दंगेखोर नाहीत परंतू त्यांना या भयंकर नाहक समस्येला सामोरे जाव लागत आहे. राज्यात अशाप्रकारे गुन्हे दाखल झालेले लाखो तरुणांचे करीयर, भविष्य उध्वस्त होईल की काय ? अशी भितीदायक स्थिती निर्माण झाली आहे. यासंदर्भात चि. कुणाल खंदारे, चि. राकेश कुरापाटी व इतर विद्यार्थ्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे निवेदन देवून याप्रश्नी मदत करण्याची मागणी केली आहे.

हे वाचा – प्रधानमंत्री सहायता निधीतून १ कोटींहून अधिक लाभ – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

यासंदर्भात आमदार प्रणिती शिंदे यांनी महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे साहेब, मा. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील साहेब व मा. गृह राज्यमंत्री, सतेज पाटील साहेब यांच्याकडे आपण अत्यंत सहानुभुतीने या प्रश्नी लक्ष घालून विद्यार्थी, बेरोजगार, नोकरीच्या शोधातील उमेदवार युवा-युवतींवर दाखल 188, 269, 336 कलमाचे गुन्हे त्वरीत मागे घेण्याकरीता तात्काळ धोरणात्मक निर्णय घेण्यात येवून तरुण पिढीला गुन्हेगार म्हणून नोंदलेला डाग पुसुन दिलासा द्यावा अशी निवेदनाव्दारे मागणी केली आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com