work-development-pune-city
Environment

पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन काम करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

पुणे-  पुणे शहराच्या विकासासाठी सर्वांनी सोबत येऊन पारदर्शकपणे काम करण्याचे आवाहन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी केले. ‘ॲमिनिटी स्पेस’ बाबत डेक्कन क्लब येथील सभागृहात  आयोजित चर्चासत्रात त्या बोलत होत्या. खासदार वंदना चव्हाण, आमदार सिद्धार्थ शिरोळे, सभागृह नेते गणेश बिडकर, माजी प्रशासकीय अधिकारी महेश झगडे आदी उपस्थित होते. डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, नागरिकांना सुविधा देतांना विनामूल्य किंवा माफक दरातील आर्थिकदृष्ट्या परवडणाऱ्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या पाहिजे. सुविधा नागरिकांच्या फायद्यासाठी असल्या पाहिजेत. शहराच्या सुरक्षितेतच्या दृष्टीने महिला सुरक्षितता महत्त्वाचा विषय आहे. मुंबई व ठाणे शहरात ‘अँमिनिटी स्पेस’ चा वापर कशाप्रकारे झाला आहे याबाबत माहिती घेतली जाईल.

हे वाचा- हृदयविका राचा झटका आणि वेळीच उपचाराच्या जनजागृती प्रशिक्षणामुळे जीव वाचविण्यास मदत होईल

                                  गरीब, मध्यमवर्गीय लोकांना ‘ॲमिनिटी स्पेस’ कसे उपलब्ध करुन देता येईल, याचा विचार करावा. ‘कार्बन न्यूट्रल’ आराखडाबाबत कृती गटासोबत पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बैठक घेतली आहे, त्यानुसार अंमलबजावणी करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. खासदार वंदना चव्हाण म्हणाल्या, ॲमिनिटी स्पेस बाबत विकास आराखड्यात नियोजन केले पाहिजे. उपलब्ध जागेचे संरक्षण केले पाहिजे. नैसर्गिक आपत्तीचा विचार करता खुल्या जागा जास्तीत जास्तीत संरक्षित ठेवणे गरजेचे आहे. ‘नागरी जंगल’ ही काळाची गरज आहे. आमदार शिरोळे,माजी प्रशासकीय अधिकारी झगडे, ‘सीओइपी’चे प्रा. रावळ, सभागृह नेते बिडकर यांच्यासह आदि मान्यवरांनी ‘ॲमिनिटी स्पेस’ बाबत आपआपली मते मांडली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143