fbpx
work-mission-ninety-days-program
Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूरकरांनो आता ओला कचरा, सुका कचरा व धोकादायक कचरा वेगळे करा; सोलापूर मनपाच्या वतीने आवाहन

पुणे Mission –  जलजीवन मिशन अंतर्गत ‘९० दिवस कार्यक्रम’ यशस्वी करण्यासाठी मिशन मोडवर काम करावे, तसेच रेट्रोफिटिंग व नवीन योजनांच्या अंमलबाजावणीसाठी कालबद्ध कार्यक्रम राबवावा, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता Water supply and sanitation विभागाचे प्रधान सचिव संजीव जयस्वाल यांनी दिले. पुणे प्रादेशिक विभागातील  पुणे, सातारा, सांगली, सोलापुर व कोल्हापुर या पाच जिल्ह्यातील ‘जल जीवन मिशन’  व ‘स्वच्छ भारत मिशन’ योजनांचा आढावा घेण्यासाठी विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त सौरभ राव, राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे अभियान संचालक ऋषिकेश यशोद, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण मुंबईचे सदस्य सचिव अभिषेक कृष्णा, भुजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा आयुक्त सी.डी. जोशी ,  पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाचे सहसचिव अभय महाजन, महाराष्ट्ट जीवन प्राधिकरण पुणेचे मुख्य अभियंता राजेंद्र राहणे, कार्यकारी अभियंता अमित आडे आदी उपस्थित होते.

प्राधान्यक्रम ठरवून येवला शहरातील विकासाची कामे मार्गी लावा

        बैठकीत जल जीवन मिशन Jal Jeevan Mission अंतर्गत राज्य शासनाने घोषित केलेल्या ‘९० दिवस कार्यक्रम’ अंतर्गत करावयाच्या कामांबाबत जयस्वाल यांनी मार्गदर्शन केले आणि जिल्हानिहाय आढावा घेतला.   या कार्यक्रमाअंतर्गत रेट्रोफिटिंग व नवीन योजना अंमलबजावणीबाबत Implementation कालबद्ध उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी येणाऱ्या अडचणी व मागण्या याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे वरिष्ठ अधिकारी,  तसेच पाचही जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी , उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पावस्व) , कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग ,  वरिष्ठ भुवैज्ञानिक , भुजल सर्वेक्षण व विकास यांच्याकडून जिल्हानिहाय जल जीवन मिशन व स्वच्छ भारत मिशनमधील योजनांचा सविस्तर आढावादेखील यावेळी घेण्यात आला.

अरे वाह ! रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी सोलापूर महानगरपालिकेचे नागरिकांना आवाहन

जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143

#solapurcitynews

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update