work under Amrut Yojana
Environment Solapur City

अमृत योजनेअंतर्गत अर्धवट कामामुळे नगरसेवक सुरेश पाटील यांनी केले रास्तारोको आंदोलन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

कुंभारवेस ते कौंतम चौक मार्गावर काही काळ वाहतूक कोंडी

सोलापूर- सोलापूर महानगरपालिकेच्या अमृत योजनेअंतर्गत शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभार वेस परिसरातील छत्रिय गल्ली येथील विठ्ठल मंदिर समोरील रस्ता गेल्या एक ते दीड वर्षापासून सुरू आहे. गेली एक-दीड वर्ष उलटून गेले तरी देखील या रस्त्याचे काम अद्याप देखील झाले नाही या परिसरातून नागरिकांना ये-जा करण्यासाठी आपला जीव मुठीत धरून चालावे लागत आहे ही परिस्थिती आहे.

हे वाचा-  भवानी पेठेत स्थानिक विकास निधीतून विविध कामाचे उदघाटन

       रस्त्यामुळे अनेक नागरिकांचे अपघात देखील झाले आहेत. महात्मा बसवेश्वर सर्कल ते शहरातील मुख्य बाजारपेठ असणाऱ्या कुंभार वेस परिसरात शहर जिल्ह्यातील छोटे-मोठे व्यापारी खरेदी करण्यासाठी येत असतात त्यांनादेखील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील व्यापाऱ्यांनी पालिका प्रशासनाला या रस्त्याचे काम पूर्ण करण्यासाठी अनेक वेळा निवेदन देखील दिले याचा काहीही फायदा झाला नाही असे यावेळी येथील व्यापाऱ्यांनी सांगितले दरम्यान शुक्रवारी सत्ताधारी भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी याठिकाणी रस्त्यावरच ठाणं मांडून हे रस्त्याचे काम त्वरित संपवा यासाठी आंदोलन केले. जोपर्यंत हा रस्ता व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपण या ठिकाणाहून उठणार नाही अशी भूमिका सुरेश पाटील यांनी घेतले. यामुळे या परिसरात मोठी वाहतुकीची कोंडी झाली होती यावेळी जोडभावी पेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळासाहेब भालचीम हे या ठिकाणी येऊन आंदोलन मागे घेण्यास सुरेश पाटील यांना प्रवृत्त केले असता सुरेश पाटील यांनी जोपर्यंत या रस्त्याचे काम हाती घेत नाही तोपर्यंत आपण उठणार नाही अशी भूमिका त्यांनी त्यांच्यासमोर मांडली.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143