fbpx
workshop-on-natural-farming

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा                                 

पुणे   Workshop   – कृषि विभागामार्फत 6 ऑक्टोबर, गुरूवारी    शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे ‘नैसर्गिक शेती’ संदर्भात कार्यशाळेच आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणेकडून (आत्मा) देण्यात आली आहे. गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्र शिक्षण, वस्त्रोद्योग, संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील, कृषिमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे आदी मान्यवर या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. नैसर्गिक शेतीला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने राज्यपाल आचार्य देवव्रत हे त्यांनी कुरुक्षेत्र हरियाणा येथे केलेले नैसर्गिक शेतीचे प्रयोग आणि प्रसाराबाबत मार्गदर्शन करणार आहेत.

16 ऑक्टोबरला मतदानकार्डाशी आधार जोडणीची विशेष मोहीम  मतदारांनी मोहिमेत सहभागी होण्याचे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आवाहन

2 हजार शेतकरी

              Workshop  राज्यभरातून सुमारे २ हजारावर शेतकरी या कार्यशाळेला उपस्थित राहणार आहेत. तांत्रिक सत्रात तज्ज्ञांचे मार्गदर्शन तसेच नैसर्गिक शेती करणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे अनुभव ऐकायला मिळणार आहेत. कार्यशाळेला जोडून नैसर्गिक शेतीबाबतच्या एका प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. 

     Workshop  या कार्यशाळेचे थेट प्रक्षेपण कृषि विभागाच्या युट्यूब चॅनलवर https://www.youtube.com/c/AgricultureDepartmentGoM करण्यात येणार आहे. तसेच या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपणाची व्यवस्था ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय कार्यालये, कृषि विज्ञान केंद्र, कृषि संशोधन संस्था आदी ठिकाणी करण्यात येणार आहे. Workshop या कार्यशाळेचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन आत्माचे कृषी संचालक दशरथ तांभाळे यांनी केले आहे.      

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update