Economy Maharashtra

जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत वेबिनार

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई – जागतिक ग्राहक हक्क दिनानिमित्त राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगातर्फे उद्या, (सोमवार, दिनांक १५ मार्च) सकाळी १० वाजता एका चर्चासत्राचे (वेबिनार) आयोजन करण्यात आले असून चर्चासत्रामध्ये राज्यपाल भगत सिंह कोश्यारी सहभागी होणार आहेत. या चर्चासत्रामध्ये खासदार शरद पवार, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. आर सी चव्हाण, राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या माजी सदस्य राज्यलक्ष्मी राव, राज्य ग्राहक आयोगाचे माजी अध्यक्ष न्या. ए पी भंगाळे, उदय वारुंजीकर, मुंबई ग्राहक पंचायतचे अध्यक्ष शिरीष देशपांडे, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे प्रभारी अध्यक्ष दिलीप शिरासाव, सदस्य डॉ संतोष काकडे आदी सहभागी होणार आहेत. https://www.youtube.com/watch?v=tWB-kZNCWlU या लिंकद्वारे हा कार्यक्रम पाहता येईल.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143