IMG 20210910 WA0016
Maharashtra Solapur City

कसबा गणपतीचे पूजन व एलईडी स्क्रीनचे आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर – सोलापूर शहरातील श्रीमंत मानाचा कसबा गणपती येथे एलईडी स्क्रीनचे उद्घाटन आणि गणरायाचे पूजन माजी पालकमंत्री व उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांच्या शुभहस्ते शुक्रवारी करण्यात आले. येणारे वर्ष सुख समृद्धीचे जावो आणि कोरोनाच प्रादुर्भाव गणेशचतुर्थीमध्ये संपून जावे व येणाऱ्या वर्षांमध्ये नागरिकांना सण उत्साहाने साजरे करण्यात येतील. महाराष्ट्रामध्ये सर्व मंदिरे मंदिरे बंद आहेत. आंध्र, कर्नाटक मध्ये सर्व मंदिरे उघडलेली आहेत. माणूस जेव्हा व्यथित होतो तेव्हा त्याला आपल्या मनातील दुःख सांगण्यासाठी तो देवाकडे जात असतो परंतु ते देखील अद्याप पर्यंत बंद आहेत. देशावर व महाराष्ट्रावर आलेले संकट लवकरात लवकर दूर व्हावे असे मागणे गणेशचतुर्थीच्या निमित्त माजी पालकमंत्री आ. विजयकुमार देशमुख यांनी गणरायकडे मागितले.

हे वाचा- सोलापूरात श्रीमंत मानाचा कसबा गणपती मंडळाच्या “श्री” ची भक्तिभावाने प्रतिष्ठापना

               याप्रसंगी ट्रस्ट अध्यक्ष सोमनाथ भोगडे, ट्रस्ट उपाध्यक्ष प्रकाश वाले, उत्सव समिती अध्यक्ष पुष्कराज मेत्रे, उपाध्यक्ष सुमित हब्बु, खजिनदार केदार मेंगाने, बिपीन धुम्मा, नगरसेवक नागेश भोगडे, मल्लिनाथ खुणे, माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे, शिवानंद कोळकुर, मल्लिनाथ दर्गोपाटील, आप्पासाहेब बिराजदार, मल्लिनाथ मसुरे, नागनाथ चितकोटी, रामचंद्र जोशी, अनिल मसुरे, आणि ट्रस्ट व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा
Youtube
Visit- https://solapurcitynews.com
#solapurcitynews

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143/ 9404151143