fbpx
Religious

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

सोलापूर Religious- सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी गेल्या चारशे ते पाचशे वर्षांपूर्वी 68 लिंग तसेच अष्टविनायक गणपती सोलापूरच्या शहराच्या पंचक्रोशीत स्थापन केले. दरम्यान शिवानुभव मंगल कार्यालय येथील 68 लिंगापैकी एकलिंग असणारे श्री कामेश्वर लिंग आणि अष्टविनायकांपैकी मानाचा शेळगी गणपती मंदिरात श्रावण मास समाप्ती निमित्त रविवारी मध्यरात्री बारा वाजता गजानन बाळासाहेब वीरभद्र हिरेमठ स्वामी पुजारी आणि विजयकुमार बेंबळगी, स्वामी परिवाराच्या वतीने रविवारी दुपारी बारा वाजेपर्यंत रुद्र पूजा, नवग्रह पूजा, महा अभिषेक, महाआरती करण्यात आली तसेच सोलापूर महानगरपालिकेचे माजी सभागृह नेता सुरेश पाटील यांच्या परिवाराच्या वतीने रविवारी दुपारी बारा वाजता श्रावण मास समाप्ती निमित्त धार्मिक विधिवेत पूजन होऊन मंत्रोपचाराच्या गजरात अक्की पूजा मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात संपन्न झाले.

राष्ट्रकुल स्पर्धेतील पदकप्राप्त क्रीडापटूंच्या बक्षिस रकमेत मोठी वाढ

             तदनंतर दुपारी बारा वाजता माजी सभागृह नेता तथा भाजपाचे ज्येष्ठ नेते सुरेश पाटील यांच्या हस्ते महाआरती करण्यात आले यावेळी विजयकुमार बेंबळगी परिवार, सिद्धू आकाशवाणी, संगमेश्वर पुराणिक, श्रीशैल स्वामी, विशाल स्वामी, महेश स्वामी, मल्लिनाथ यालगी, उमाकांत बेलूर, सुनील रसाळे गणेश चिंचोली, बसवराज करजगीकर, विजय कोळी, लिंगराज पाटील अंबादास कोळी, श्रीकांत कलशेट्टी यांच्यासह श्री कामेश्वर लिंग भक्तगण मानाचा शेळगीचा गणपती भक्तगण हजारोंच्या संख्येने या धार्मिक कार्यात सहभागी झाले होते गेल्या अनेक वर्षापासून श्रावण मास समाप्ती निमित्त शिवानुभव मंगल कार्यालय येथे श्री कामेश्वर लिंग आणि शेळगीचा गणपती धार्मिक विधिवत पूजन होत असते. रविवारी दुपारी महा आरती नंतर हजारों भक्तगणांसाठी महाप्रसाद वाटप होऊन श्रावण मासी समाप्ती मोठ्या भक्तीमय व मंगलमय वातावरणात पार पडले

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

By Digital Media

Digital Media देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईट Digital Media वर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे. ****अधिक माहितीसाठी संपर्क *** सुनिल कोडगी, संपादक 9503221143 / 9404151143

Corona Live Update