Economy

पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अभिवादन

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

मुंबई- देशाला पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकून देणारे, ऑलिम्पिक मैदानावर, सातासमुद्रापार भारताचा तिरंगा डौलानं फडकावणारे मराठमोळे पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री तथा महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष अजित पवार यांनी त्यांना अभिवादन केले आहे. स्वर्गीय खाशाबा जाधव यांना अभिवादन करता उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, खाशाबा जाधव यांनी १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिकमध्ये प्रतिकूल परिस्थितीचा सामना आणि खडतर आव्हानांवर मात करुन कुस्तीतलं तसंच देशासाठी पहिलं वैयक्तिक ऑलिम्पिक पदक जिंकलं. स्वर्गीय खाशाबा जाधव यांनी जिंकलेलं ऑलिम्पिक पदक आजही देशातील खेळाडू व क्रीडाक्षेत्रासाठी मुख्य प्रेरणास्त्रोत आहे. महाराष्ट्राच्या मातीत जन्मलेले, घडलेले ऑलिम्पिकवीर पैलवान स्वर्गीय खाशाबा जाधव आणि हेलसिंकी ऑलिम्पिक मैदानावरची त्यांनी केलेली ऐतिहासिक कामगिरी भावी पिढीला कायम प्रेरणा देत राहील, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143