Economy

महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांची बालगृहाला भेट

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

बुलडाणा- राज्याच्या महिला व बालविकासमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज बुलडाणा येथील मुलांचे बालगृह व निरीक्षणगृहाला भेट दिली. यावेळ त्यांनी इमारतीमधील विविध कक्षांची पाहणी केली. तसेच बालगृहातील सध्या प्रवेशित मुलांशी चर्चा केली. याप्रसंगी प्रवेशित असलेल्या मुलांकडून मंत्री श्रीमती ठाकूर यांनी सत्कार स्वीकारला. यावेळी त्यांच्यासमावेत जि.प अध्यक्षा मनिषा पवार, महिला व बालकल्याण सभापती ज्योती पडघान, माजी आमदार सर्वश्री हर्षवर्धन सपकाळ, राहुल बोंद्रे, जि.प सदस्य जयश्री शेळके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास)  रामरामे, महिला व बालविकास अधिकारी श्रीमती सोनुने, जिल्हा बालसंरक्षण अधिकारी मराठे आदींसह संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143