National

आता आधार कार्ड नसेल तरी मिळणार कोरोनाची लस

Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter फॉलो करा व अपडेट राहा

नवी दिल्ली-  एखाद्या व्यक्तीकडे आधार कार्ड नसेल तर त्याला कोरोनाच्या लसीपासून वंचित ठेवता येऊ शकत नाही. त्यामुळे एखाद्याकडे आधार कार्ड नसेल तरीही त्या व्यक्तीला कोरोनाची लस मिळणार आहे. तसेच कोणत्याही रुग्णाला, त्याच्याकडे केवळ आधार कार्ड नाही या कारणाने त्याला रुग्णालयात भरती न करणे किंवा औषधांची आणि उपचारांची सुविधा देण्यास नकार देणं या गोष्टी आता बंद होणार आहेत. या कारणांसाठीही आता आधार बंधनकारक नसणार असल्याचं स्पष्ट केलं आहे.

                  देशभरात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असताना UIDAI चा हा निर्णय महत्वपूर्ण मानला जातोय. या आधी अनेकदा केवळ आधार कार्ड नसल्याने लोकांना अत्यावश्यक सेवा तसेच अनेक वस्तूंपासून वंचित ठेवलं जायचं. कोरोना रुग्णाना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेक अडचणी येत होत्या. तसेच उपचार आणि औषधांसाठीही या गोष्टी घडताना दिसत होत्या. आता UIDAI च्या स्पष्टीकरणामुळे या गोष्टीवर पडदा पडला आहे. 

                            देशात कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे या रुग्णांना रुग्णालयात भरती करताना आधार कार्ड नसल्याने अनेकदा ऑनलाईन व्हेरिफिकेशन होत नव्हतं. त्यामुळे रुग्णालयेही अशा रुग्णांना भरती करुन घ्यायला नकार द्यायचे. आता या गोष्टीसाठी आधार कार्डची गरज नसल्याने अनेकांना मोठा दिलासा मिळणार आहे.  कोरोनाची लस घ्यायची असेल तर आपली ओळख म्हणून आधार कार्ड दाखवणं बंधनकारक करण्यात आलं होतं. त्यामुळे ज्यांच्याकडे आधार कार्ड नाही त्यांना लस मिळणार नाही का असा प्रश्न उपस्थित झाला होता. तसेच गेली चार महिने यावर कोणतेही स्पष्टीकरण केंद्र सरकार वा UIDAI कडून आलं नव्हतं. त्यामुळे अनेकांच्या संभ्रमात वाढ झाली होती. आता हा प्रश्न सुटला असून एखाद्याकडे आधार कार्ड नसले तरीही त्याला आता कोरोनाची लस मिळणार आहे हे स्पष्ट झालं आहे. 

#solapurcitynews

जाहिरात–

डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा

जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143

News Network
देशात रेडिओ, टिव्ही, वृत्तपत्रांना मागे टाकत डिजिटल मिडिया उद्यास आले आहे. येणाऱ्या काळात आणि पुढिल पिढीसाठी डिजिटल मिडियावर आणखी जोर वाढणार आहे. आमच्या फेसबुक वाचक संख्या व आमच्यावरील विश्वास पाहून नविन www.solapurcitynews.com वेबसाईटवर आपल्या सेवेत आलो आहोत. देशातील व महाराष्ट्रासह आपल्या गावापर्यंतची बातमी तुमच्या पर्यंत पोहचवणार आहोत. सोशल मिडिया व डिजिटल मिडियाकडे सर्वांचा कल वाढतोय म्हणून आम्ही डिजिटल मिडियाकडे पाऊल टाकत आहे.
https://solapurcitynews.com