Solapur City News ● Facebook ● Facebook Page ● Youtube ● Twitter ● Dailyhunt फॉलो करा व अपडेट राहा.
सोलापूर ZP Solapur – शिक्षण विभागाने लाच मागण्यासह मानसिक छळ केल्याचा आरोप ग्लोबल रणजितसिंह डिसले गुरूजी (Ranjitsinh Disale) यांनी केला होता. या आरोपावर मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी (Dilip Swami) यांनी नोटीसाद्वारे जाब विचारला होता. या नोटीसाचा खुलासा सादर केला असून, ‘साहेब, मला माफ करा’. मी अनावधनाने आरोप केल्याचा आशय खुलाशात दिसून आला आहे. मात्र, ‘चुकीला माफी नाही’ असे म्हणत सीईओ स्वामी यांनी डिसले यांचा खुलासा फेटाळून लावला आहे.
डिसले गुरुजी हे गेल्या पाच वर्षांपासून परितेवाडी येथील जिल्हा परिषद ZP Solapur शाळेत गैरहजर असताना पगार काढला कसा? अशी जाब विचारणारी नोटीस प्राथमिक शिक्षण विभागाने मुख्याध्यापकाला जारी केली आहे. याबाबतची पार्श्वभूमी अशी की, डिसले गुरूजी यांच्या आरोपांवर सीईओ दिलीप स्वामी यांनी कारणे दाखवा नोटीस जारी केली होती. एका टीव्ही न्यूज चॅनलच्या मुलाखतीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी मानसिक त्रास दिला आणि पैशांची मागणी केल्याचा आरोप गुरुजी डिसले यांनी केला होता. या आरोपावर सीईओ स्वामी यांनी चौकशी करणार असल्याचे नोटीसाद्वारे जाब विचारला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे माढा तालुक्यातील परितेवाडी जिल्हा परिषद शाळेस भेट देणार होते. या निमित्ताने गुरुजी डिसले आणि सीईओ यांच्याशी दोनवेळा संपर्क झाला. मात्र, संपर्कादरम्यान मानसिक त्रास अथवा लाचेची मागणी होत असल्याचे सीईओ यांच्या निर्दशनास आणले नसल्याचा ठपका नोटीस ठेवण्यात आला.
जाहिरात– डिजिटल युगात डिजिटल जाहिरात करा आणि आपल्या व्यवसाय वृद्धिंगत करा.
Youtube- https://www.youtube.com/c/SolapurCityNews
Visit- https://solapurcitynews.com
जाहिरातीसाठी आजच संपर्क साधा – 9503221143 / 9404151143
#solapurcitynews